Rishabh Pant Health Updates : भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतवर डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंत सध्या धोक्याबाहेर असून त्याची प्रकृती चांगली आहे. पण या सगळ्यात आता पंतच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पंतला रुग्णालयाच्या खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे. संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक श्याम शर्मा यांनी सांगितले की, पंत सध्या बरा आहे. संसर्गाचा धोका पाहून त्यांना खासगी वॉर्डात हलवण्यात आले आहे.
वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी रिषभ पंतही शॉर्टलिस्ट; BCCI च्या यादीतील 'ते' २० खेळाडू कोण?
श्याम शर्मा पुढे म्हणाले की, पंतच्या लिगामेंटच्या दुखापतीबाबत बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल. बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, पंतच्या कपाळावर दोन कट, गुडघा, मनगट, घोटा आणि पायाचे लिगामेंट फाटले. याशिवाय पंतच्या पाठीला दुखापत झाली आहे. श्याम शर्मा पुढे म्हणाले की, सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. पूर्ण बरी होईपर्यंत ते डेहराडून येथील रुग्णालयातच राहील.
श्याम शर्मा यांनीही लोकांना खास आवाहन केले आहे. ते म्हणाले की, पंतांला भेटण्यासाठी कोणीही रुग्णालयात जाऊ नये कारण त्यामुळे संसर्गाचा धोका आणखी वाढेल. जे लोक पंतला भेटणार आहेत त्यांनी ते टाळावे, कारण संसर्गाची शक्यता असते. पंतला भेटण्यासाठी व्हीआयपी मुव्हमेंट नसावे आणि त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांनी ते टाळावे, कारण पंतला संसर्ग होण्याची शक्यता असते. तो स्थिर आहे आणि बरा होत आहे. बीसीसीआयचे डॉक्टर इथल्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत.
चालकाने त्याचा जीव वाचवलापंतचा अपघात झाला त्याचवेळी बसचा चालक सुशील कुमार हा हरिद्वारहून दिल्लीच्या दिशेने दुसऱ्या बाजूने जात होता. अशा स्थितीत पंतची गाडी अचानक समोर आली आणि त्यांनी ब्रेक लावला. त्यानंतर त्यांनी पंतला मदत केली आणि रुग्णालयात नेले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"