आज पहाटे भारताचा क्रिकेट प्लेअर रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातातरिषभ पंत गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्याच्यावर देहरादून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी महत्वाची माहिती दिली आहे.
'रिषभ पंत नुकताच रुग्णालयात दाखल झाला आहे. डॉक्टरांची टीम त्याची काळजी घेत असून तपासणी करत आहेत. या तपासणीनंतर संपूर्ण माहिती समजू शकेल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं डॉक्टरांनी सांगितले आहे.
'डॉक्टरांचे पथकही त्याच्याशी बोलत असून त्याल कुठे जखम झाली आहे, याची तपासणी सुरू आहे. सध्या ऑर्थोपेडिक्सची टीम आणि प्लास्टिक सर्जन उपचार करत आहेत. संपूर्ण तपासानंतरच गंभीर दुखापत आहे की नाही हे सांगता येईल. सध्या कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे समोर आलेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही उर्वरित माहिती देऊ पुढच्या अर्ध्या तासात सर्व काही स्पष्ट होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पंतला सुरुवातीला रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. पंत दिल्लीहून त्याच्या मर्सिडीज कारमधून परतत होता. रुरकीजवळील मंगलोर कोतवाली भागात NH 58 वर त्याच्या कारला अपघात झाला.
रिषभ पंतचा अपघात झाला तेव्हा तो स्वतः कार चालवत होता आणि कारमध्ये तो एकटाच होता. रिषभ पंतला कार चालवताना झोप आली, त्यामुळे त्याची कार रस्त्यावरील रेलिंगला धडकली. धडकेनंतर कारलाही आग लागली. आग लागल्यानंतर रिषभ पंत कारची काच फोडून कारमधून बाहेर पडला.
रिषभ पंतच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. फोटो आणि माहितीनुसार रिषभ पंतच्या डोक्याला दुखापत झाली आहे.त्यासोबतच वाहन जळाल्याने ऋषभ पंतच्या पाठीवर आणि शरीराच्या इतर भागावर भाजलेल्या जखमा आहेत. या अपघातात रिषभ पंतचा एक पायही फ्रॅक्चर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.