भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी शुक्रवारची सकाळ वाईट बातमी घेऊन आली. टीम इंडियाचा धाकड फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. ही बातमी चाहत्यांच्या काळजात धस् करणारी होती, तशीच ती रिषभच्या आईसाठीही धक्कादायक होती. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तिलाच सरप्राईज देण्यासाठी रिषभ रातोरात दिल्लीवरून एकटाच निघाला होता. वाटेत ही दुर्घटना घडली. रिषभच्या कारला अपघात झाल्याची बातमी रुरकीत वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या आईला सांगण्यात आले. ती तशीच लगबगीने काय झाले असेल या विचारात हॉस्पिटलकडे निघाली. या तासाभरात काय घडले हे तिच्यासोबत असलेल्या आमदारांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
Rishabh Pant's car accident Video: रिषभ पंतच्या कार अपघाताचे CCTV फुटेज आले; भयानक वेग, एवढा की कार हवेतच उडाली...
उत्तराखंडच्या खानपूरचे आमदार उमेश कुमार यांना कळताच त्यांनी रिषभचे घर गाठले. रिषभच्या कुटुंबाला घेऊन त्यांनी साडे सहा वाजता हॉस्पिटल गाठले. तेव्हा रिषभवर उपचार सुरु होते. उमेश कुमार यांनी सांगितले की, रिषभची आई सरोज या आता त्याच्यासोबत आहेत. रिषभला आताच एअरलिफ्ट करणे किंवा दिल्लीला हलविणे ठीक नसल्याचेही ते म्हणाले.
उमेश कुमार यांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांची भेट घेतली. डॉ. नागर यांनी रिषभला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. रिषभच्या पायाची लिगामेंट तुटली आहे. डोके आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत, असे सांगण्यात आले. यामुळे रिषभला तातडीने देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलविण्याची सोय करण्यात आली. रिषभची आई अॅम्बुलन्समधून रिषभसोबतच तिकडे गेली.
Rishabh Pant Car Accident: रिषभ पंत एकटाच कारमध्ये अडकलेला, आग लागली; लोकांनी काच फोडली अन्...
रिषभला दिल्लीला एअरलिफ्ट करण्यासाठी प्रयत्न केले, परंतू खराब हवामानामुळे थांबविण्यात आले. रस्ते मार्गेही नेण्याचा विचार झाला परंतू तिथे जाण्यासाठी कमीतकमी १० तास लागणार होते. यामुळे रिस्क घेणे योग्य वाटले नाही. यामुळे रिषभवर उत्तराखंडमध्येच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आमदारांनी सांगितले. रिषभला सध्या एअरलिफ्ट करण्याची तातडीची आवश्यकता नाहीय, असे हेल्थ अपडेटमध्ये डॉक्टरांनी सांगितले आहे. परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
उमेश कुमार यांनी सांगितले की, रिषभला रुग्णालयात पाहून त्याची आई सरोज खूप घाबरली होती. सध्या तिची प्रकृती ठीक नाही, ती सतत रिषभसोबतच आहे.
Web Title: Rishabh Pant car Accident Update: Rishabh's leg ligament cut, dangerous to airlift to Delhi; The MLA said what happened within an hour...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.