India vs South Africa 1st Test: अरे देवा! मुख्यमंत्र्यांनी ऋषभ पंतला शुभेच्छा देताना केली 'ही' चूक; नंतर डिलीट करून केलं नवीन ट्वीट

ऋषभ पंतने यष्टीरक्षण करताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी महेंद्रसिंह धोनीचा मोठा विक्रम मोडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 09:17 PM2021-12-29T21:17:28+5:302021-12-29T21:17:38+5:30

whatsapp join usJoin us
Rishabh Pant Congratulations Chief Minister Pushkar Singh Dhami made mistake Later deleted tweet IND vs SA | India vs South Africa 1st Test: अरे देवा! मुख्यमंत्र्यांनी ऋषभ पंतला शुभेच्छा देताना केली 'ही' चूक; नंतर डिलीट करून केलं नवीन ट्वीट

India vs South Africa 1st Test: अरे देवा! मुख्यमंत्र्यांनी ऋषभ पंतला शुभेच्छा देताना केली 'ही' चूक; नंतर डिलीट करून केलं नवीन ट्वीट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa 1st test: भारतीय संघाचा सध्या दक्षिण आफ्रिका दौरा सुरू आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाने मालिकेची सुरूवात चांगली केली. पहिल्या डावाअंती भारताने १३० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी खराब झाली पण तरीही टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ३०५ धावांचे आव्हान दिले. या सामन्यात तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीच्या वेळी ऋषभ पंतने एक विक्रम केला. यष्टीरक्षक म्हणून त्याने १०० बळींचा टप्पा पार केला. यात ९२ झेल आणि ८ स्टंपिंगचा समावेश आहे. पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वात जलद १०० बळींचा टप्पा पार करणारा भारतीय ठरला. त्याने धोनीचा विक्रम मोडला. त्याच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत होतं. पंत हा उत्तराखंडचा ब्रँड अँम्बेसे़डॉर आहे. त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी एक ट्विट केलं. पण त्यात चूक असल्याने त्यांनी ट्वीट डिलीट करत पुन्हा नवे ट्वीट केले.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी आधी ट्वीटमध्ये लिहिलं होतं, "खेळूया आणि जिंकूया... दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत उत्तराखंडचा सुपुत्र आणि राज्याचा ब्रँड अँम्बेसेडॉर असलेला ऋषभ पंत याने अप्रितम कामगिरी करत सर्वात जलद शंभरी बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याचे अभिनंदन!" मात्र, ऋषभ पंत हा गोलंदाज नसल्याने त्याने बळी घेतले असा शब्दप्रयोग करणं योग्य नव्हतं. ही चूक त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं.

डिलीट केलेलं ट्वीट

पुष्कर सिंग धामी यांनी त्यानंतर पुन्हा दुसरे ट्वीट केले. त्यात त्यांनी चूक सुधारली. "माझ्या क्रिकेटप्रेमींनो, भारताचा प्रतिभावान खेळाडू ऋषभ पंत याने कसोटी क्रिकेटमध्ये यष्ट्यांमागे सर्वात जलद शंभर बळींचा टप्पा पूर्ण करणारा क्रिकेटपटू ठरला. ही त्याला शुभेच्छा देण्याची वेळ आहे", असं ट्वीट त्यांनी केलं.


 
दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला कसोटी सामना हा पंतचा २६वा कसोटी सामना होता. महेंद्रसिंग धोनीने ३६व्या कसोटी सामन्यात यष्ट्यांमागे बळींचे शतक पूर्ण केलं होतं. त्याचा हा विक्रम होता. तो पंतने मोडला. या यादीत पंत आणि धोनीनंतर वृद्धिमान साहा तिसरा (३७), किरण मोरे चौथे (३९), नयन मोंगिया पाचवे (४१) आणि सय्यद किरमाणी सहाव्या स्थानी (४२) आहेत.

Web Title: Rishabh Pant Congratulations Chief Minister Pushkar Singh Dhami made mistake Later deleted tweet IND vs SA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.