Rishabh Pant Declined The Captaincy Delhi Ranji Trophy Team Update : रणजी करंडक स्पर्धेतील पुढच्या फेरीतील लढतीसाठी दिल्लीचा संघ ठरला आहे. रिषभ पंतशिवायविराट कोहलीही दिल्लीच्या संघाचा भाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. कोहलीच्या खेळण्यावर सस्पेन्स कायम असला तरी पंत खेळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतला होती कॅप्टन्सीची ऑफर, पण त्याने दिला साफ नकार
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पराभवानंतर बीसीसीआयने टीम इंडियातील खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटकडे वळावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अनेक स्टार रणजी स्पर्धेतील सामन्यात देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळू शकते. पंत दिल्लीच्या संघाकडून मैदानात उतरणार हे जवळपास पक्के आहे. एवढेच नाही तर त्याला संघाच्या कॅप्टन्सीची ऑफरही देण्यात आली होती. पण त्याने ही आफर नाकारली आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास गोष्ट
पंतन का नकोय कॅप्टन्सीची जबाबदारी? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
रिषभ पंतनं कॅप्टन्सीला नकार दिल्यावर आयुष्य बडोनी दिल्ली संघाचे नेतृत्व करताना दिसेल. टाइम्स ऑफ इंडियानं वृत्तानुसार, डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली म्हणाले आहेत की, "रिषभ पंत याने मला कॉल केला होता. निवडकर्त्यांनी कॅप्टन्सीमध्ये कोणताही बदल करू नये, असे मत त्याने मांडले. एखाद्या सामन्यासाठी नेतृत्व बदल करणं योग्य नाही. मला संघातील वातावरण खराब करायचं नााही. जो आधीपासून संघाचे नेतृत्व करतो आहे तोच माझ्यापेक्षा उत्तमरित्या संघाला पुढे घेऊन जाईल. मैदानात मार्गदर्शना नक्कीच करे, असे पंतनं म्हटल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दिल्ली संघाला उर्वरित दोन्ही सामन्यात मिळवायचाय विजय
रणजी करंडक स्पर्धेतील पुढच्या फेरीत दिल्लीचा संघ सौराष्ट आणि रेल्वे विरुद्ध सामने खेळणार आहे. पुढच्या फेरीत पात्र ठरण्यासाठी दिल्लीच्या संघाला दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. रिषभ पंतच्या संघातील एन्ट्रीमुळे संघ निश्चितच मजबूत होईल. यात विराट कोहलीची भर पडली तर हा सामना आणखी लक्षणीय ठरेल, यात शंका नाही.