Join us  

उत्तराखंडमधील दुर्घटनेमुळे रिषभ पंत व्यथित; पीडितांना मदत जाहीर करत इतरांनाही केलं आवाहन

Uttarakhand Glacier Burst: भारतीय संघातील यष्टीरक्षक, फलंदाज रिषभ पंत हा उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेमुळे व्यथित झाला आहे. त्याने ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

By बाळकृष्ण परब | Published: February 08, 2021 9:03 AM

Open in App

चेन्नई - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या जलप्रलयानंतर मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची सुटका करण्या आली आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, भारतीय संघातील यष्टीरक्षक, फलंदाज रिषभ पंत हा या दुर्घटनेमुळे व्यथित झाला आहे. त्याने ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.या ट्विटमध्ये रिषभ पंत म्हणाला की, उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याने खूप दु:ख झाले आहे. मी चेन्नईत सुरू असलेल्या कसोटी सामन्याचं मानधन मदत कार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्घटनेतील पीडितांच्या मदतीसाठी दानशूरांनी पुढे यावे, असे मी आवाहन करतो. 

रिषभ पंत हा मूळचा उत्तराखंडमधील असून, त्याचा जन्म हरिद्वार येथे झाला होता. त्याचे कुटुंब उत्तराखंडमधील रहिवासी आहे. दरम्यान, सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चेन्नई कसोटीत रिषभ पंतने ८८ चेंडून ९१ धावांची स्फोटक खेळी केली होती. या खेळीदरम्यान, पंतने पाच षटकार आणि ९ चौकार मारले होते. रिषभच्या या खेळीच्या जोरावरच भारताला सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला होता. 

जलप्रलय आणि ३०० मीटर बोगद्यातील ते पाच तास, दुर्घटनेत वाचलेले कर्मचारी म्हणाले, तेव्हा वाटलं...दरम्यान, रविवारी सकाली १० ते ११ च्या सुमारास उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून महापूर आला होता. या दुर्घटनेमुळे ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. तर शेकडो कर्मचारी हे विविध ठिकाणी बोगद्यांमध्ये अडकले आहे. अनेकांची सुटका करण्यात यश मिळालं असलं तरी आतापर्यंत १४ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ