Rishabh Pant BCCI Central Contracts: भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्यासाठी गेले सहा महिने खूपच फलदायी ठरले. दिल्ली कॅपिटल्सने त्याला करारमुक्त केल्यानंतर, IPL लिलावात त्याच्यावर सर्वाधिक बोली लागली. संजीव गोयंका यांच्या लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला तब्बल २७ कोटी रुपयांना विकत घेतले. १८ वर्षांच्या IPL इतिहासातील ही सर्वात महागडी बोली ठरली. पंतचा अपघात झाल्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानात फारसा सक्रीय नव्हता. पण कमबॅकनंतर त्याचा भाव वधारला. तशातच नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक करारामध्येही पंतला बढती मिळाली आणि त्याचा A ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला.
रिषभ पंतला फायदा
बीसीसीआयने केंद्रीय करार जाहीर केले. यामध्ये रिषभ पंतला B ग्रेडमधून A ग्रेडमध्ये बढती देण्यात आली. २०२२-२३ च्या वार्षिक करारामध्ये पंत A ग्रेडमध्ये होता. डिसेंबर २०२२ मध्ये त्याचा मोठा अपघात झाला. मृत्युच्या दाढेतून परत आलेला पंत बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळे त्याला वार्षिक करारात B ग्रेडमध्ये ढकलण्यात आले होते. IPL 2023 मध्ये तो खेळू शकला नव्हता. त्यानंतर IPL 2024 मध्ये त्याने पुनरागमन केले. तेव्हापासून तो टीम इंडियाचा भाग आहे. तो टी२०, वनडे आणि टेस्ट असे तीनही फॉरमॅट खेळत असल्याने त्याला बढती मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार रिषभ पंतला आता वार्षिक करारात बढती देण्यात आली आहे.
इशान किशन, श्रेयस अय्यरचे पुनरागम; रजत पाटीदारला पदार्पण
बीसीसीआयने २०२४-२५ वर्षांसाठी एकूण ३४ खेळाडूंना करारबद्ध केले. त्यापैकी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा या चौघांना A+ ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याखालोखाल केएल राहुल, शुबमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत यांना A ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले आहे. सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल यांच्यासह श्रेयस अय्यरलाही B ग्रेडमध्ये घेण्यात आले आहे. तर रिंकू सिंह तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिध कृष्णा, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, आकाश दीप, हर्षित राणा यांच्या इशान किशनचे C ग्रेडमध्ये पुनरागमन झाले आहे. तर अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती आणि नितीश कुमार रेड्डीला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.
शार्दुल ठाकूरसह चौघांना धक्का
मराठमोळा शार्दुल ठाकूर, अमरावतीचा जितेश शर्मा, वेगवान गोलंदाज आवेश खान आणि जितेश शर्मा या चौघांना या वार्षिक करारातून वगळण्यात आले आहे.
Web Title: Rishabh Pant has been promoted from Grade B to Grade A in BCCI Central contracts after being most expensive player in IPL history Luck paid off
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.