Join us  

Rishabh Pant Health: Rishabh Pant च्या गुडघ्याचे ऑपरेशन होणार; World Cup मध्ये खेळण्याची शक्यता धूसर...

Rishabh Pant Health: रिषभ पंतचे ऑपरेशन झाल्यानंतर सूमारे 9 महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 7:58 PM

Open in App

Rishabh Pant Health: भारताचा स्टार क्रिकेटर रिषभ पंत (Rishabh Pant) चा काही दिवसांपूर्वीच भीषण अपघात झाला. या अपघातात रिषभला गंभीर इजा झाली असून, त्याच्या भविष्याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. आधी म्हटले जात होते की, भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) पर्यंत रिषभची संघात वापसी होईल, पण आता आता एक मोठी माहिती समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिषभ पंतच्या गुडघा आणि पायाच्या घोट्याचीची सर्जरी होणार आहे आणि यामुळे पुढील 9 महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. काल म्हणजेच बुधवारी बीसीसीआय रिषभला एअरलिफ्ट करुन देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये आणले आहे. पायाच्या सर्जरीसाठी पंतला लंडनला पाठवले जाऊ शकते. 

म्हणून मुंबईत आणलेबीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इंसाइडस्पोर्ट्सशी बातचीतमध्ये सांगितले की, “देहरादूनच्या हॉस्पिटलमध्ये लोकांची गर्दी व्हायची, रिषभला आराम मिळत नव्हता, त्यामुळेच त्याला मुंबईत आणले आहे. इथे तो कुटुंबीयांसोबत सुरक्षित वातावरणात असेल आणि यामुळे लवकर रिकव्हर होण्यास मदत होईल. शरीरावरील जखमा हिल झाल्यानंतर डॉक्टर त्याच्या लिगामेंट सर्जरीबाबत पुढील पाउले उचलतील.''

तो ठिक होणे महत्वाचेअधिकाऱ्याने पुढे म्हटले की, “तो ठिक झाल्यावरच त्याला सर्जरीसाठी लंडनला पाठवले जाईल. त्याला ठिक होण्यास किती वेळ लागेल, हे सध्या सांगता येणार नाही. पण, सर्जरीनंतर तो सूमारे 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार हे नक्की. सध्या आम्ही त्याच्या वापसीपेक्षा तो ठिक होण्यावर जास्त भर देत आहोत. तो शंभर टक्के ठिक झाल्यावरच त्याच्या पुनरागमनावर चर्चा होईल.”

टॅग्स :रिषभ पंतअपघातऑफ द फिल्ड
Open in App