Join us  

रिषभ पंतला उपचारासाठी डेहराडूनहून दिल्लीत आणणार की परदेशात पाठवणार? BCCIने दिले महत्त्वाचे अपडेट्स

भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभवर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 1:52 PM

Open in App

भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभवर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याला डेहराडून येथून दिल्लीला उपचारासाठी हलवणार असल्याचे सांगण्यात आले होते, तर बीसीसीआय त्याला उपचारासाठी परदेशात पाठवणार असल्याचे बोलले जात आहे. रिषभच्या लिगामेंटच्या झीजवर उपचार करण्यास वेळ लागेल आणि तो सुमारे 6 महिने मैदानावर परत येऊ शकणार नाही.  

रिषभला झालेली दुखापत गंभीर नसल्याचे डॉक्टरांचे मत आहे. पण सध्या त्याला मैदानापासून दूर रहावे लागणार आहे. पंतला ५-६ महिने विश्रांती घ्यावी लागणार आहे. रिषभला डोके-पाठ, पाय, गुडघा आणि दुखापत झाली आहे.

एक्स-रे आणि सीटी स्कॅन रिपोर्ट्समध्ये फ्रॅक्चर, मेंदू आणि पाठीच्या कण्याला दुखापत झालेली नाही, पण गुडघा आणि लिगामेंटस मध्ये दुखापत असल्याचे समोर आले आहे. 'लिगामेंट झीज' बरी होण्यासाठी २ ते ६ महिने लागू शकतात.

रिषभला सूज असल्याने घोट्याचा आणि गुडघ्याचा एमआरआय अद्याप झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या एमआरआय नंतरचा डॉक्टर पुढचा निर्णय घेणार आहेत. शनिवारीच डीडीसीए टीमने रिषभ पंतची भेट घेतली, त्याच्या तब्येतीचा आढावा घेतला. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेतली. डीडीसीएच्या अहवालावर बीसीसीआय पंतच्या पुढील उपचारांबाबत निर्णय घेईल. पंत प्रवासासाठी योग्य असल्यास त्याला एअरलिफ्ट केले जाऊ शकते. पंतला उपचारासाठी परदेशात पाठवायचे की नाही, याचा निर्णय मंडळाच्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेले डॉ. दिनशॉ पार्डीवाला घेऊ शकतात.

मृत्यूला चकवा देणारे ५ क्रिकेटपटू; मोहम्मद शमीसह भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराचाही समावेश

रिषभ हा यष्टिरक्षक फलंदाज आहे आणि आक्रमक फलंदाजी करतो, लांब शॉट्स मारतो. फलंदाजीसाठी पाठ, हात, मनगट, पाय, अस्थिबंधन, गुडघे, घोटे मजबूत राहणे आवश्यक आहे. विकेटकीपिंगसाठी तासन्तास मैदानावर उभे राहावे लागले, खाली वाकावे लागले, उड्या माराव्या लागल्या. रिषभ पंत पुढील तीन ते चार महिने मैदानावर परतला नाही तर तो ऑस्ट्रेलिया मालिका आणि आयपीएल 2023 मधून बाहेर पडू शकतो. 

टॅग्स :रिषभ पंतऑफ द फिल्ड
Open in App