Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि यष्टिरक्षक रिषभ पंतच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. महिनाभरापूर्वी म्हणजेच ३० डिसेंबर २०२२ रोजी रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातातून रिषभ पंत थोड्यक्यात बचावला. अपघाताच्या काही मिनिटांत रिषभ पंतची कार जळून खाक झाली होती. या अपघातात रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. साधारण महिनाभराच्या उपचारांनंतर रिषभ पंतच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी रिषभ पंतला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज कधी मिळणार, याबाबत सांगितले.
इनसाइड स्पोट्सची बोलताना बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले की, रिषभ पंतच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत आहे. रिषभ पंतवरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. याच आठवड्यात रिषभ पंतला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो, अशी गुड न्यूज मेडिकल टीमने दिली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
रिषभ पंतला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावे लागेल
मात्र, डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही दिवसांनी रिषभ पंतला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. उजव्या गुडघ्याच्या ACL वर ऑपरेशन होईल. दिल्ली-डेहराडून हायवे वर झालेल्या अपघातात उजव्या गुडघ्याच्या तिन्ही लिगामेंटला मार लागला होता. डॉ. दिनशॉ पारडीवाला आणि त्यांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया केली. तीन तास हे ऑपरेशन सुरु होते. रिषभवर आणखी एका सर्जरीची आवश्यकता आहे, असे सांगितले जात आहे. यावर बोलताना बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले की, ही शस्त्रक्रिया कधी करायची, त्याचा निर्णय डॉक्टर घेतील. बीसीसीआय डॉ. पारडीवाला आणि हॉस्पिटलच्या सतत संपर्कात आहे. लवकरच आम्हाला रिषभला मैदानात पाहायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, रिषभ पंत मैदानात कधी परतणार, ते त्याच्या रिहॅबवर अवलंबून आहे. दुसऱ्या सर्जरीनंतर पूर्णपणे फिट होण्यासाठी रिषभला ४ ते ५ महिने लागतील. त्यानंतर रिषभचे रिहॅब आणि ट्रेनिंग सुरु होईल. मैदानावर परतून प्रॅक्टिस सुरु करण्यासाठी आणखी दोन महिने लागू शकतात. म्हणजे रिषभला फिट होऊन मैदानात परतण्यासाठी सुमारे ५ ते ७ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे सांगितले जात आहे. तसेच रिषभ पंतला आगामी वनडे वर्ल्ड कप २०२३ ला मुकावे लागू शकते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: rishabh pant health update bcci officer said rishabh pant is remarkable recovery and set to be discharged from hospital in this week
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.