भारतीय क्रिकेट टीमचा विकेटकीपर रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला. या अपघातातरिषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. रिषभवर डेहराडून येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याला डेहराडून येथून दिल्लीला उपचारासाठी हलवणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्येक क्रिकेट चाहत्याचे लक्ष रिषभ पंतच्या तब्येतीच्या अपडेटवर आहे, तसेच अपघाताच्या कारणाबाबतही चर्चा सुरू आहेत. रिषभ पंतचा अपघात डुलकी लागल्याने झाल्याचे सांगण्यात येत होते, आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातामागचे कारण सांगितले आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सर्व अंदाजांना पूर्णविराम दिला आहे. 'रस्त्यात खड्डा आल्याने हा अपघात झाला आणि खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रिषभच्या कारचा अपघात झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री धामी यांनी दिली. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी रविवारी रिषभ पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. 'सध्या रिषभवर मॅक्समध्येच उपचार सुरू आहेत, बीसीसीआयचे डॉक्टर आणि मॅक्सचे डॉक्टर संपर्कात आहेत.
रिषभ पंतला उपचारासाठी डेहराडूनहून दिल्लीत आणणार की परदेशात पाठवणार? BCCIने दिले महत्त्वाचे अपडेट्स
30 डिसेंबरला सकाळी दिल्लीहून रुरकीला जात असताना रिषभ पंतचा अपघात झाला. पंत याचा अपघात कसा झाला यावर वेगवेगळी विधाने येत होती, त्यामुळे वाद निर्माण झाला होता. आधी रिषभ पंतने डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले, मात्र नंतर डीडीसीएने रस्त्यावरील खड्ड्याचे मुख्य कारण सांगितले. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऋषभ पंतची कार पाहून त्याचा ओव्हरस्पीडिंग हेही अपघाताचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये रिषभ पंतची कार 5 सेकंदात सुमारे 200 मीटरचे अंतर कापत असल्याचा दावा करण्यात आला होता, या प्रकरणात कारचा वेग 150 पेक्षा जास्त किंवा जवळपास असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ओव्हरस्पीडिंगबाबत पोलिसांनी अद्याप काहीही बोललेले नाहीत. या वादानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वक्तव्य करून अटकळांना पूर्णविराम दिला असून खड्ड्यातून बचाव करताना अपघात झाल्याचे कारण सांगितले आहे.
खड्डे, वेग की डुलकी, कसा झाला रिषभ पंतचा अपघात? सीएम धामी यांनी केलं मोठं वक्तव्य
दरम्यान, रस्त्यावरील खड्डे रातोरात भरले आहेत. रिषभ पंतच्या गाडीला हायवेवर नरसनजवळ अपघात झाला, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. हे ठिकाण मृत्यूचे ठिकाण बनले असून येथे शेकडो अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.रिषभ पंतच्या अपघातानंतर या रस्त्यावरील खड्डे रातोरात बुजवण्यात आले आहेत.
Web Title: Rishabh Pant Health Update CM Dhami visits hospital in Dehradun to see injured Rishabh Pant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.