भारतीय क्रिकेट टीम मधील फलंदाज रिषभ पंत याच्या कारचा ३० डिसेंबर रोजी दिल्लीहून रुरकीला जात असताना अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला. यात त्याचे लिगामेंटला इजा झाली.रिषभला डेहराडूनहून मुंबईला उपचारासाठी हलवण्यात आले. आता पंत सदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
भारतीय संघाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रिकेटपटू रिषभ पंतच्या गुडघ्यावर काल मुंबईतील एका खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून तो वेगाने बरा होत आहे. डॉ. पार्डीवाला आणि त्यांच्या टीमने शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास पंतवर शस्त्रक्रिया केली जी सुमारे दोन ते तीन तास चालली.
"तुम्ही फक्त प्रश्न विचारा, बाकीच्या गोष्टी...."; पाकिस्तानचा बॉलिंग कोच Shaun Tait पत्रकारावरच संतापला
25 वर्षीय रिषभ पंत 30 डिसेंबरच्या सकाळी आपल्या आईला भेटण्यासाठी दिल्लीहून रुरकीला जात होता. यात त्याची कार दुभाजकाला धडकली. यानंतर हरियाणा रोडवेजच्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टरने पंतला कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. पंत कारमधून बाहेर पडताच कारने पेट घेतला. त्याच्या एमआरआय स्कॅन अहवालात कोणतीही दुखापत नसल्याचे समोर आले आहे. बीसीसीआय पंतच्या सतत संपर्कात आहे. त्याचबरोबर पंत लवकर बरे व्हावा यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. (
Rishabh Pant Health Update)
रिषभ पंत टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे.रिषभने एकट्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात मालिका जिंकून दिली. पंतने भारतासाठी 33 कसोटी सामने, 30 एकदिवसीय सामने आणि 66 टी-20 सामने खेळले आहेत.
Web Title: Rishabh Pant Health update rishabh pant knee surgery was successfully conducted and recovering fast indian cricket team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.