काल पहाटे भारतीय क्रिकेट प्लेअर रिषभ पंत याच्या कारचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला डेहराडून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आईला सरप्राईज देण्यासाठी रिषभ रातोरात दिल्लीवरून एकटाच निघाला होता. वाटेत ही दुर्घटना घडली.
शनिवारी सकाळी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनची एक टीम डेहराडूनला रिषभ पंतच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहे. रिषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या संदर्भात डीडीसीएने एक निवेदन दिले आहे. यात त्यांची एक टीम परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डेहराडूनला जात असल्याचे सांगितले आहे. गरज भासल्यास रिषभ पंतला उपचारासाठी दिल्लीत आणले जाईल, असंही यात म्हटले आहे.
पंतच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर डीडीसीएने पाठवलेले त्याला पुढील उपचारासाठी घेऊन जायचे की नाही याचा निर्णय घेईल. पंतला पुढील उपचारांची आवश्यकता असल्यास त्याला दिल्लीत आणले जाईल आणि गरज पडल्यास एअरलिफ्टचीही व्यवस्था केली जाईल, असं यात म्हटले आहे.
Rishabh Pant Accident : अनिल कपूर, अनुपम खेर यांनी घेतली रिषभ पंतची भेट; म्हणाले, प्रार्थना करा...
'आमची एक टीम रिषभ पंतला पाहण्यासाठी दिल्लीला जात आहे, गरज पडल्यास आम्ही त्याला उपचारासाठी दिल्लीत आणू आणि येथे प्लास्टिक सर्जरी करू. आम्ही पंतला प्लॅस्टिक सर्जरीसाठी दिल्लीला विमानाने नेऊ शकतो, असं डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी सांगितले.