ICC Test batsman ranking: इंग्लंडविरुद्ध २००७ नंतर कसोटी मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न अपूर्ण राहिले. पाचव्या कसोटीत इंग्लंडने ३७८ धावांचे लक्ष्य ७ विकेट्स राखून सहज पार करताना मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. या कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जॉनी बेअरस्टो व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी भरारी घेतलेली दिसतेय. बेअरस्टोने दोन्ही डावांत शतकी खेळी करून इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आणि त्याने ११ स्थानांच्या सुधारणेसह थेट दहावे स्थान पटकावले आहे.
भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा!
३२ वर्षीय बेअरस्टोने मागील तीन कसोटी सामन्यांत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीत त्याने दोन्ही डावांत शतक झळकावले आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१-२०२३ मध्ये त्याने आतापर्यंत ५५.३८ च्या सरासरीने १२१८ धावा केल्या आहेत आणि त्यात ६ शतकांचा समावेश आहे. २०१८नंतर प्रथमच तो टॉप टेनमध्ये दाखल झाला आहे.
MS Dhoni लाही जे जमले नाही ते रिषभ पंतने केले; १९७३, १९५० सालचे अनेक विक्रम मोडले
यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याने भारताकडून सर्वाधिक रेटिंग गुण कमावताना गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत त्याने १४६ व ५७ अशी दमदार कामगिरी केली होती. मागील सहा कसोटीत त्याने दोन शतकं व तीन अर्धशतक झळकावली आहे. त्याने सहा स्थानांची सुधारणा केली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली टॉप टेनमधून बाहेर फेकला गेला आहे. त्याला पाचव्या कसोटीत ११ व २० धावा करता आल्या आणि तो आता १३व्या क्रमांकावर आहे. ६ वर्षांनंतर किंवा २०५३ दिवासांनंतर विराट कोहली आयसीसी कसोटी फलंदाजांच्या टॉप टेनमधून बाहेर गेला आहे.
जो रूटनेही दुसऱ्या डावात नबाद १४२ धावांची खेळी केली आणि तो कसोटी फलंदाजांमध्ये ९२३ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. आयसीसी रँकींगच्या इतिहासात सर्वाधिक रेटींग पॉईंट्स मिळवणाऱ्या टॉप २० मध्ये रुटने एन्ट्री घेतली आहे. कसोटी गोलंदाजांमध्ये आर अश्विन ( ८४२) व जसप्रीत बुमराह ( ८२८) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा ( ३८४) व आर अश्विन ( ३३५) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.