Join us  

IPL 2023 , Rishabh Pant : रिषभ पंत आयपीएल २०२३त नाही खेळणार; बघा दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण सांभाळणार

IPL 2023, Rishabh Pant Accident : रिषभ पंतच्या अपघातामुळे दिल्ली कॅपिटल्सला तात्पुरत्या कर्णधाराची गरज आहे. रिषभला आयपीएल २०२३च्या संपूर्ण किंवा किमान पहिल्या टप्प्याला मुकावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 2:59 PM

Open in App

IPL 2023, Rishabh Pant Accident : रिषभ पंतच्या अपघातामुळे दिल्ली कॅपिटल्सला तात्पुरत्या कर्णधाराची गरज आहे. रिषभला आयपीएल २०२३च्या संपूर्ण किंवा किमान पहिल्या टप्प्याला मुकावे लागणार आहे. शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पंतच्या कपाळावर दोन कट, गुडघा, मनगट, घोटा आणि पायाचे लिगामेंट फाटले. याशिवाय पंतच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो जवळपास सहा महिने क्रिकेटपासून दूर राहू शकतो. अशात दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा डेव्हिड वॉर्नर ( David Warner) कडे सोपवली जाऊ शकते. मनीष पांडे हाही पर्यात आहे पण नुकत्याच झालेल्या लिलावात तो संघात सामील झाला आहे.  

६ मिनिटांत १६७ कोटी! MI, CSK, RCB पासून सर्व फ्रँचायझींचा अंतिम संघ घ्या जाणून

धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज नशीबाच्या जोरावर आणि चांगल्या लोकांच्या मदतीमुळे वाचला. झोप लागल्याने त्याच्या भरधाव वेगाने चालणाऱ्या कारने रेलिंगला धडक दिली आणि आग लागली. पंतच्या पाठीवर वरवरच्या दुखापतींशिवाय कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत. परंतु त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला किमान ३ महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागू शकते. “पंतला लिगामेंटच्या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान तीन ते सहा महिने लागतील आणि जर ते गंभीर असेल तर त्याला जास्त वेळ लागू शकतो. पुढील मूल्यांकन त्याच्या दुखापतीच्या अहवालावर आधारित असू शकते,”  डॉ कमर आझम यांनी सांगितले.

दिल्ली कॅपिटल्समध्ये पृथ्वी शॉ, मनीष पांडे यांच्याशिवाय मिचेल मार्श यांना कर्णधारपदाचा अनुभव आहे. पण डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादला आयपीएल विजेतेपद आणि ऑस्ट्रेलियाचे यशस्वी नेतृत्व केल्याने तो प्रमुख उमेदवार आहे. वॉर्नरही संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. पंत आयपीएल २०२३ मधून पूर्णपणे बाहेर पडला, तर वॉर्नर दीर्घ कालावधीनंतर कर्णधारपदावर परत येईल.

खराब फॉर्मचे कारण देत SRH ने वॉर्नरला आयपीएल २०२१ मध्ये कर्णधारपदावरून काढून टाकले. पण त्यानंतर त्याने  पुन्हा फॉर्म मिळवताना टीकाकारांना उत्तर दिले. दिल्ली कॅपिटल्स या क्षणी कोणताही निर्णय घेऊ इच्छित नाही, कारण रिषभच्या प्रकृतीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. जेव्हा वेळ येईल आणि तो जर वेळेत पूर्णपणे बरा झाला नाही, तेव्हा DC अधिकृत घोषणा करेल.  

दिल्ली कॅपटिल्स - रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर, ललित यादव, खलील अहमद, लुंगी एनगिडी, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, एम रहमान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, सर्फराज खान, प्रविण दुबे, यश धुल, मिचेल मार्श, विकी ओत्स्वाल, रिपल पटेल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनिष पांडे, रिली रोसोवू.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :आयपीएल २०२२रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सडेव्हिड वॉर्नर
Open in App