ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन ट्वेंटी-20, तर 5 वन डे सामने होणारमालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार
नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : घरच्या प्रेक्षकांसमोर झालेल्या मानहानिकारक पराभवाची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारतात येणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यजमानांना कसोटी मालिकेत 70 वर्षांत प्रथमच घरच्या मैदानावर मालिका पराभवाची धुळ चाखवली होती, त्यानंतर वन डे मालिकेतही कांगारूना हार मानावी लागली. या ऐतिहासिक कामगिरीमुळे हा दौरा भारतीयांच्या नेहमी स्मरणार्थ राहिल. पण, याच मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीपासून सुरू झालेला बेबी सीटिंचा किस्सा अजूनही कायम आहे. भारत दौऱ्यावर येणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे स्वागत करण्यासाठी स्टार स्पोर्ट्स वाहिनीने जाहीरात तयार करताना 'बेबी सीटिंग'च्या मुद्याचा आधार केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. पेनने यष्टीमागे टिप्पणी करताना पंतला माझ्या मुलांना सांभाळणार का? असे विचारले होते. त्यानंतरही हा सागा सुरूच आहे. आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ येथे दोन ट्वेंटी-20 व पाच वन डे सामने खेळणार आहेत. या दौऱ्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीने तयार केलीली जाहीरात सध्या व्हायरल होत आहे. या जाहीरातीत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग बेबी सीटरच्या भूमिकेत दिसत आहे.
या व्हिडीओत सेहवाग ऑस्ट्रेलियाची जर्सी घातलेल्या लहान मुलांचे स्वागत आणि त्यांची देखभाल करताना दिसत आहे. '' जब हम ऑस्ट्रेलिया गये थे, तो उन्होने पूछा था बेबी सीटिंग करोगे? हमने कहा सबके सह आजाओ. जरूर करेंगे. ( जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियात गेलो होतो, तेव्हा त्यांनी आम्हाला बेबी सीटिंग करणार का, असे विचारले होते. तेव्हा आम्ही सांगितले सर्व जण या नक्की करू.)," असे विधान सेहवाग त्या व्हिडीओत करत आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गद फलंदाज मॅथ्यू हेडनला ही जाहीरात काही आवडली नाही. त्यानं ऑस्ट्रेलियाला कमी लेखू नका, असा दम सेहवाग व त्या वाहिनीला भरला. या कल्पनेचा खरा जनक असलेल्या
रिषभ पंतनेही या जाहीरातीच्या वादात उडी मारली आहे. त्यानेही सेहवागच्या जाहीरातीला रिट्विट करताना मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला,'' वीरू पाजीने मला क्रिकेटच्या मैदानावर नेहमी प्रेरणा दिली आहे. त्याच्याकडून मी क्रिकेट खेळायला शिकलो आणि आता बेबी सीटिंगही शिकणार आहे.''
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मार्च व एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे.
Web Title: Rishabh Pant reacts to Virender Sehwag's babysitting TV commercial
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.