कटक : मैदानात नुसती हुल्लडबाजी करणाऱ्या रिषभ पंतला चाहत्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. त्यामुळे पंतला चाहत्यांनीच आता निवृत्त केल्याचे पाहायला मिळत आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या सामन्यात पंतने सोपे झेल सोडले. त्यामुळे चाहते त्याच्यावर चांगलेच रागावले. सातत्याने यष्टीरक्षणात नापास होऊनही पंत संघात कसे स्थान कायम राखतो, असा सवालही चाहत्यांनी उपस्थित केला आहे.
पंतवर उखडलेल्या चाहत्यांनी पंतला चक्क टॅक्सी ड्रायव्हर म्हटले आहे. कारण पंत हा कॅच जशा ड्रॉप करतो, तसेच तो टॅक्सीतील ग्राहकांनाही योग्यपद्धतीने सोडू शकेल, असे म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे.
भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत हा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची स्टाईल मारत असल्याचे आपण नेहमी पाहतो. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पंत धोनीची स्टाईल मारत होता. पण यावेळी एक सोपा झेल पंतने सोडल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मैदानातील प्रेक्षकांनी पंतला चांगलेच धारेवर घेतल्याचे पाहायला मिळाले.
पंत हा स्टम्पच्या मागून गोलंदाजांना मार्गदर्शन करत होता. पण त्याला स्वत:ला मात्र चांगली कामगिरी करता येत नव्हती. पंतने या सामन्यात सोपे झेल सोडले. त्यानंतर मात्र चाहत्यांनी पंतला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर प्रेक्षकांनी धोनी... धोनी... या गजराने पंतला हैराण केल्याचे पाहायला मिळाले.
वेस्ट इंडिजचा रोस्टन चेसने भोपळाही फोडला नव्हता. त्यावेळी फिरकीपटू कुलदीप यादवचा एक चेंडू चेसच्या बॅटची कडा घेऊन पंतच्या दिशेने गेला. हा एकदम सोपा झेल होता. त्यामुळे पंत हा झेल सहज पकडेल, असे वाटत होते. पण पंतने मात्र हा सोपा झेल सोडला. यावेळी कुलदीपला आपली निराशा लपवता आली नाही.
नवदीप सैनीला नक्कीच आठवेल पहिलाच चेंडू, पण असं घडलं तरी काय...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला संधी देण्यात आली. पण या सामन्यात सैनीने टाकलेला पहिला चेंडू सैनीला नक्कीच आठवणीत राहील. पण नेमकं असं घडलंय तरी काय...
वेस्ट इंडिजचा इव्हिन लुईस हा सैनीच्या पहिल्या चेंडूचा सामना करणार होता. सैनीने चेंडू टाकला आणि लुईसने हा चेंडू थेट सीमारेषे पार धाडला. त्यामुळे पहिल्याच चेंडूवर सैनीने चौकार दिला. त्यामुळे हा पहिला चेंडू सैनीच्या चांगलाच लक्षात राहील, असे म्हटले जात आहे.
नाणेफेक जिंकल्यावर भारताने प्रथम फलंदाजी का स्वीकारली नाही, सांगतोय कर्णधार विराट कोहली
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताने प्रथम फलंदाजी का केली नाही, या प्रश्नाचे उत्तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिले आहे.
आतापर्यंत कोहलीला जास्त नाणेफेक जिंकता आलेल्या नाहीत. पण तिसऱ्या सामन्यात मात्र कोहलीने नाणेफेक जिंकल्याचे पाहायला मिळाले. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यावर कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याता निर्णय घेतला. यावेळी भारतीय संघात एकच बदल करण्यात आल्याचे कोहलीने सांगितले.
नाणेफेकीनंतर कोहली म्हणाला की, " कटकची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगला आहे. सध्या थोडे धुके त्यामुळे रात्री चांगले दव पडेल. दव पडल्यावर फलंदाजी करणे सोपे होऊ शकते. त्यामुळे मी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे."
Web Title: Rishabh Pant retired by the fans, see what happened
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.