IPL 2023, Rishabh Pant Accident : रिषभ पंत इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये खेळणार नसल्याचे दिल्ली कॅपिटल्सचे संचालक सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले. अपघातामुळे रिषभला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांसोबतच आयपीएल २०२३ लाही मुकावे लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत तो पुनरागमन करेल, अशी आशा आहे. ३० डिसेंबरला भीषण अपघातानंतर त्याच्यावर सुरुवातीला देहराडून येथे उपचार घेतले अन् आता त्याच्या मुंबईतील अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आता दोन नावं समोर येत आहेत.
पंतच्या कपाळावर दोन कट, गुडघा, मनगट, घोटा आणि पायाचे लिगामेंट फाटले. याशिवाय पंतच्या पाठीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो जवळपास सहा महिने क्रिकेटपासून दूर राहू शकतो. अशात दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा डेव्हिड वॉर्नर ( David Warner) कडे सोपवली जाऊ शकते. मनीष पांडे हाही पर्यात आहे पण नुकत्याच झालेल्या लिलावात तो संघात सामील झाला आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये पृथ्वी शॉ, मनीष पांडे यांच्याशिवाय मिचेल मार्श यांना कर्णधारपदाचा अनुभव आहे.
डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादला आयपीएल विजेतेपद आणि ऑस्ट्रेलियाचे यशस्वी नेतृत्व केल्याने तो प्रमुख उमेदवार आहे. वॉर्नरही संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. खराब फॉर्मचे कारण देत SRH ने वॉर्नरला आयपीएल २०२१ मध्ये कर्णधारपदावरून काढून टाकले. पण त्यानंतर त्याने पुन्हा फॉर्म मिळवताना टीकाकारांना उत्तर दिले. पृथ्वी रणजी करंडक स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे आणि त्याने यापूर्वीही दिल्लीचे कर्णधारपद भूषविले आहे. अशात पृथ्वी व वॉर्नर यांच्यात कर्णधारपदाची शर्यत आहे, परंतु वॉर्नरचे पारडे जड आहे.
दिल्ली कॅपटिल्स - रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर, ललित यादव, खलील अहमद, लुंगी एनगिडी, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, एम रहमान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, सर्फराज खान, प्रविण दुबे, यश धुल, मिचेल मार्श, विकी ओत्स्वाल, रिपल पटेल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनिष पांडे, रिली रोसोवू.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Rishabh Pant ruled out of IPL 2023, This Two Players in race to Delhi Capitals Captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.