Join us  

Rishabh Pant, IPL 2022 DC vs RR: 'तू स्वत:ला कोण समजतोस?'; नो बॉलच्या वादावरून रिषभ पंतवर संतापला माजी क्रिकेटपटू

नो बॉलच्या वादावरून रिषभ पंतवर करण्यात आली दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 4:57 PM

Open in App

Rishabh Pant, IPL 2022 DC vs RR: शुक्रवारी रंगलेल्या दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामन्यात मोठा गोंधळ झाला. नो-बॉलवरून झालेल्या वादामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत नाराज झाला आणि त्याने आपल्या फलंदाजांना परत बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर हे प्रकरण कसेबसे हाताळण्यात आले. मात्र इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि सामन्यातील समालोचक केविन पीटरसन या संपूर्ण प्रकारामुळे संतापला. या संपूर्ण वादावर केविन पीटरसनने आपलं रोखठोक मत व्यक्त केलं.

"ऋषभ पंतला संपूर्ण खेळ समजत नव्हता असं मला वाटतं. त्याच्या वाद घालण्यामुळे संपूर्ण खेळाची लय तुटली. पंचांच्या निर्णयापेक्षा दिल्ली कॅपिटल्स संघाचा निर्णय अधिक धक्कादायक झाला. मला वाटतं रिकी पाँटिंग असते तर कदाचित असं झालं नसतं. जोस बटलरने ज्या प्रकारे हस्तक्षेप केला, ते पूर्णपणे योग्य आहे. 'तुमचं नक्की काय चाललंय' हे विचारण्याचा त्याला पूर्ण अधिकार होता. तू स्वत:ला कोण समजतोस? सामन्याच्या मध्यात प्रशिक्षकाला मैदानात पाठवणे हा पूर्णपणे चुकीचा निर्णय होता", अशा शब्दांत त्याने रिषभ पंतवर टीका केली.

दरम्यान, दरम्यान, राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २२२ धावा केल्या. सलामीवीर जोस बटलरने ६५ चेंडूत ११६ धावांची खेळी केली. देवदत्त प़ड़िकलने देखील अर्धशतक झळकावले. तर संजू सॅमसनने १९ चेंडूत नाबाद ४६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात रिषभ पंतने २४ चेंडूत ४४ धावा केल्या. ललित यादवने ३७ धावांची खेळी केली. तर पृथ्वी शॉ ने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. शेवटच्या षटकात रॉवमन पॉवेलने तीन षटकार लगावत सामन्यात रंगत आणली होती. पण अखेर दिल्ली पराभूत व्हावे लागले.

टॅग्स :आयपीएल २०२२रिषभ पंतदिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्स
Open in App