रिषभ पंतनं लावला महेंद्रसिंग धोनीकडे क्लास; राहिला रांची मुक्कामी 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी युवा यष्टिरक्षकाला संधी देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 04:21 PM2019-10-25T16:21:08+5:302019-10-25T16:21:31+5:30

whatsapp join usJoin us
Rishabh Pant spends time with MS Dhoni at his Ranchi farmhouse | रिषभ पंतनं लावला महेंद्रसिंग धोनीकडे क्लास; राहिला रांची मुक्कामी 

रिषभ पंतनं लावला महेंद्रसिंग धोनीकडे क्लास; राहिला रांची मुक्कामी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी युवा यष्टिरक्षकाला संधी देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. तसंही धोनीचा उत्तराधिकारी म्हणून टीम इंडियात रिषभ पंतकडे पाहिलं जात आहे. त्याचा सध्याचा फॉर्म हा चिंताजनक असला तरी आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत तोच पहिली पसंती असणार आहे. त्यासाठी पंतनेही कंबर कसली आहे आणि चक्क धोनीकडेच क्लास लावला आहे.

कामगिरीत सातत्यानं अपयशी ठरलेल्या रिषभला नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळेच रांची कसोटीनंतर रिषभ कॅप्टन कूल धोनीच्या घरी मुक्कामी राहिला. त्यानं धोनीकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. तिसऱ्या कसोटीत धोनीनं टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी लावली होती. त्यानं संघातील खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर खेळाडू आपापल्या घरी परतले, परंतु रिषभ रांचीतच राहिला. त्यानं धोनीकडून कामगिरीत सुधारणा करण्याबद्दल टीप्स घेतल्या. 


यावेळी पंतनं धोनीच्या खास सदस्याचीही भेट घेतली. 


महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याबाबत निवड समिती अध्यक्षांनी केले मोठे विधान
मुंबई : विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत महेंद्रसिंग धोनीला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आता धोनी मैदानात दिसणार की नाही, याबाबत बऱ्याच वावड्या उठत आहेत. त्यामध्ये भारतीय संघाचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीच्या भवितव्याबाबत एक मोठे विधान केले आहे.

एमएसके प्रसाद यांनी यावेळी सांगितले की, " विश्वचषकानंतर आमचे विचार स्पष्ट झाले आहेत. आम्ही युवा यष्टीरक्षकांना जास्त संधी देणार आहोत. धोनीच्या मनातही हीच गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही धोनीऐवजी युवा यष्टीरक्षकांना यापुढे पसंती देणार आहोत."
 

Web Title: Rishabh Pant spends time with MS Dhoni at his Ranchi farmhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.