India vs Australia, 2nd Test : पहिल्या कसोटीतील मानहानिकारक पराभव विसरून टीम इंडिया नव्या दमानं ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहे. कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतणार असल्यानं यापुढील कसोटींत अजिंक्य रहाणेकडे ( Ajinkya Rahane) संघाचे नेतृत्व असणार आहे. विराट मायदेशी जाण्यापूर्वी खेळाडूंना काही मार्गदर्शन करणार आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटीत टीम इंडियात चार बदल अपेक्षित आहेत आणि त्यात रिषभ पंतचे ( Rishabh Pant) नाव आघाडीवर आहे. अनेक जाणकारांनीही रिषभ अंतिम ११मध्ये असायला हवा असे मत मांडले आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता बळावत असल्याचे दिसल्यानं रिषभही सज्ज होत आहे. जिममध्ये कसरत करताचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मायदेशात परतण्यापूर्वी विराट कोहली टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी भरवणार विशेष 'शाळा'!
पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर शुबमन गिलला संधी मिळणे अपेक्षित आहे. मयांक अग्रवालसह तो सलामीला खेळण्याची शक्यता अधिक आहे. मधल्या फळीत विराट कोहलीच्या जागी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे. त्याच्यासाथीला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे ही जोडी... हनुमा विहारीनेही निराश केले आहे आणि त्यामुळे त्याच्याजागी रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू खेळवण्याचा विचार कर्णधार रहाणे नक्की करेल. जडेजा दुसऱ्या कसोटीसाठी फिट आहे. वृद्धीमान सहाच्या जागी रिषभचा पर्याय आहे. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळेल. संघानं पंत आणि सहा या दोघांनाही खेळवण्याचे ठरवल्यास यष्टिंमागे सहाच दिसेल, तर जडेजाला संधी मिळणे अवघड होऊन बसेल. 'बॉक्सिंग डे' कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूला मिळणार विशेष पदक; जाणून घ्या कारण
पाहा व्हिडीओ
दुसऱ्या कसोटीतील Playing XI - शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा/रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज.