Rishabh Pant vs Sanju Samson Who is Better After 16 ODI Matches : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी बीसीसीआय लवकर भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करणार आहे. पाकिस्तान यजमान असलेल्या स्पर्धेत भारतीय संघाचे सर्व सामने हायब्रिड मॉडेलनुसार, दुबईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. या मिनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियात कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सध्या चांगलीच रंगताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विकेट किपर बॅटरच्या रुपात ३ नावे शर्यतीत आहेत. लोकेश राहुलला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून ब्रेक देण्यात येणार असून चॅम्पिन्स ट्रॉफीसाठीच्या संघात त्याचं नाव फिक्स झाल्याचेही बोलले जात आहे. याशिवाय रिषभ पंत आणि संजू सॅमसन हे दोन भिडू विकेट किपर बॅटरच्या शर्यतीत आहेत. संजू सॅमसन याने आतापर्यंत १६ वनडे सामने खेळले आहेत. इथं एक नजर टाकुयात १६ वनडे सामन्यानंतर वनडेत कुणाची कामगिरी ठरलीये सर्वात भारी त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
रिषभ पंत वर्सेस संजू सॅमसन! टीम इंडियासाठी कुणी किती वनडे सामने खेळले?
रिषभ पंत आणि संजू सॅमसन या दोघांपैकी कुणाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियात संधी मिळणार याची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. दोघांच्या वनडेतील एकंदरीत प्रवासाबद्दल बोलायच तर रिषभ पंतनं आतापर्यंत ३१ वनडे सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. दुसरीकडे संजू सॅमसनला फक्त १६ वनडे सामन्यात संधी मिळाली आहे.
रिषभ पंतची वनडेतील कामिगरी
रिषभ पंत याने २१ ऑक्टोबर २०१८ मध्ये वनडेत पदार्पण केले. आतापर्यंत त्याने ३१ सामने खेळले असून २७ डावात त्याने ३३.५ च्या सरासरीसह १०६.२ च्या स्ट्राइक रेटनं ८७१ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १२५ ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. यातील पहिल्या १६ वनडे सामन्याचा विचार केला तर पंतनं १४ डावात २६.७१ च्या सरासहीसह ३७४ धावा केल्या. याशिवाय विकेटमागे ८ झेल आणि एका फलंदाजाची यष्टिचितच्या रुपात शिकार केलीये.
संजू सॅमसनची वनडेतील कामगिरी
केरळचा स्टार बॅटर संजू सॅमसन याने २३ जूलै २०२१ मध्ये आपला पहिला वनडे सामना खेळला. श्रीलंका विरुद्ध पदार्पण करणाऱ्या संजूनं १६ सामन्यातील १४ डावात ५६.६६ च्या सरासरीनं ५१० धावा केल्या आहेत. यात तो पाच वेळा नाबाद राहिला आहे. वनडेत त्याच्या ख्तायात १ शतक आणि ३ अर्धशतकांची नोंद आहे. विकेटमागे ९ झेल आणि २ स्टंपिंग अशी कामगिरी त्याने करून दाखवली आहे. संजूसोबत तुलना करताना रिषभ पंत हा आकडेवारीच्या बाबतीत मागे पडतो.
Web Title: Rishabh Pant vs Sanju Samson See Stats After 16 ODI Who is Better For Team India Squad For ICC Champions Trophy 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.