India vs Australia : अजिंक्य रहाणेनं 'ती' कॅच सोडली नसती तर चौथ्या कसोटीवर टीम इंडियाचे निर्विवाद वर्चस्व गाजले असते. पहिल्या सत्रात तुल्यबळ खेळ झाल्यानंतर दुसरे सत्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिले. टी नटराजननं तिसऱ्या सत्रात ऑसींच्या दोन सेट फलंदाजांना माघारी पाठवून टीम इंडियाला कमबॅक करून दिले. टीम पेन व कॅमेरून ग्रीन यांनी सहाव्या विकेटसाठी ६१ धावांची नाबाद भागीदारी केली आणि संघाला पहिल्या दिवसअखेर ५ बाद २७४ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण, या सामन्यात असा एक किस्सा झाला की सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा रंगली. तो किस्सा रिषभ पंत ( Rishabh Pant) याच्याशी संबंधित असल्यानं नेटिझन्स अजून रस घेऊन त्यात सहभागी होत आहेत. नवे असून टीम इंडियाचे गोलंदाज जबरदस्त भिडले; ऑस्ट्रेलियानंही सडेतोड उत्तर दिले
आर अश्विन व जसप्रीत बुमराह या प्रमुख गोलंदाजाशिवाय टीम इंडिया आज मैदानावर उतरली. उपलब्ध पर्यांयांपैकी हिच दोन अनुभवी जोडी टीम इंडियाकडे होती, परंतु चौथ्या कसोटीत त्यांनाही माघार घ्यावी लागली. त्यामुळे टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांना पदार्पणाची संधी मिळाली. रवींद्र जडेजा व हनुमा विहारी यांनाही दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे मयांक अग्रवाल व शार्दूल ठाकूर यांचे अंतिम ११मधील स्थान पक्के झाले. भारताच्या अंतिम ११मधील गोलंदाजांकडे एकूण चार कसोटी सामन्यांचा अनुभव होता. त्यात नवदीप सैनीलाही ( Navdeep Saini) दुखापतीमुळे स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तरीही उरलेल्या गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी पाठवला. टीम इंडियाचा गोलंदाज हॉस्पिटलमध्ये; BCCIने दिले महत्त्वाचे अपडेट्स
पहिल्या सत्रात मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी अनुक्रमे डेव्हिड वॉर्नर व मार्कस हॅरीस यांना माघारी पाठवले. दुसऱ्या सत्रात स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांच्या ७० धावांच्या आणि लाबुशेन व मॅथ्यू वेड यांच्या ११३ धावांच्या भागीदारीनं टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. लाबुशेनला ३७ व ४८ धावांवर अनुक्रमे अजिंक्य व चेतेश्वर पुजारा यांच्याकडून जीवदान मिळाले आणि त्यानं पाचवे कसोटी शतक पूर्ण केले. तिसऱ्या सत्रात टी नटराजननं शतकवीर लाबुशेन व वेड ( ४५) यांना बाद करून टीम इंडियाला पुन्हा कमबॅक करून दिले. पण टीम पेन व कॅमेरून ग्रीन यांनी दिवसअखेर खिंड लढवताना अर्धशतकी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियानं दिवसअखेर ५ बाद २७४ धावा केल्या आहेत. अजिंक्य, हे तू काय केलंस!; कॅप्टनची चूक टीम इंडियाला पडली महागात, Video
८४व्या षटकात टीन नटराजनच्या गोलंदाजीवर पेन फटका मारण्यास हुकला व चेंडू यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हाती विसावला. पंतनं झेलबादची जोरदार अपील करताना कॅप्टन रहाणेकडे धाव घेतली. पण, रहाणेनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या स्लीपला असलेला रोहित शर्माही त्याच्या या कृतीकडे पाहून हसू लागला. रिषभला राग आला होता, परंतु त्यानं त्यावर नियंत्रण ठेवले. आर अश्विन, जसप्रीत बुमराह नाही; चौथ्या कसोटीत दोन पदार्पणवीर घेऊन मैदानावर उतरली टीम इंडिया
पाहा नेमकं काय घडलं...