इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वाचे ( IPL 2021 Remaining Matches ) उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती (UAE ) येथे पार पडणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स ( CSK), मुंबई इंडियन्स ( MI), दिल्ली कॅपिटल्स ( DC), पंजाब किंग्स ( PBKS) या संघांचा ताफा दुबईत झाला आहे. Delhi Capitalsचा प्रमुख खेळाडू श्रेयस अय्यरही ( Shreyas Iyer) दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तोही दुबईत दाखल झाला आहे. अय्यरच्या तंदुरुस्तीमुळे आता पुन्हा एकदा DC चे नेतृत्व रिषभ पंतकडे ( Rishabh Pant) राहणार की नाही, याची चर्चा सुरू झाली आहे. पण, DCनं यावरील सस्पेन्स हटवत अय्यरला मोठा धक्का दिला आहे.
sportskeeda मध्ये आलेल्या वृत्तानुसार दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांनी सांगितले की,''श्रेयस अय्यर तंदुरुस्त झाला आहे, ही आनंदाची बातमी आहे आणि तो पुन्हा मैदानावर दिसणार आहे. पण, त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी आणखी वेळ द्यायला हवा, असे DC व्यवस्थापकांना वाटते. त्यामुळे रिषभ पंतकडेच नेतृत्व कायम राहणार आहे.'' रिषभच्या नेतृत्वाखाली दिल्लीनं ८ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
गुणतालिका!आयपीएल २०२१ मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं 8 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्स 7 पैकी 5 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( 10 गुण), मुंबई इंडियन्स ( 8), राजस्थान रॉयल्स ( 6), पंजाब किंग्स ( 6), कोलकाता नाइट रायडर्स ( 4) व सनरायझर्स हैदराबाद ( 2) हे गुणतालिकेत एकापाठोपाठ आहेत.
22 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, सायं. 7.30 वाजल्यापासून25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून28 सप्टेंबर - कोलकाता नाइट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि, चेन्नई सुपर किंग्स, सायं. 7.30 वाजल्यापासून8 ऑक्टोबर - रॉयल चँलेंजर्स बँगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, सायं. 7.30 वाजल्यापासून