रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी

रिषभ पंतची ( Rishabh Pant) झटपट होत असलेली रिकव्हरी पाहून BCCI आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय स्टाफही आश्चर्यचकीत झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 04:56 PM2023-06-15T16:56:59+5:302023-06-15T16:57:51+5:30

whatsapp join usJoin us
Rishabh Pant's recovery progressing faster than expected; Jasprit Bumrah and Shreyas Iyer are aiming to make a comeback in the 2023 Asia Cup | रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी

रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रिषभ पंतची ( Rishabh Pant) झटपट होत असलेली रिकव्हरी पाहून BCCI आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय स्टाफही आश्चर्यचकीत झाला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या रस्ता अपघातानंतर रिषभ पंतवर उपचार केले गेले अन् तो तंदुरुस्तीसाठी बंगळुरू येथील NCA मध्ये दाखल झाला. रिषभची ही रिकव्हरी पाहून BCCI त्याला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळवण्याच्या तयारीला लागल्याचे वृत्त ESPNcricinfo ने दिले आहे. पण, अपघातानंतर त्याला २०२३ मध्ये क्रिकेट न खेळण्याचाच सल्ला मिळाला होता. काल त्याने कोणत्याही आधाराशिवाय चालत असल्याचा आणि दादर चढत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. 


रिषभला आता वेदना होत नाहीत, परंतु तो अद्यापही पूर्णपणे बरा झालेला नाही. फिजिओ एस रजनिकांत यांच्या मार्गदर्शनाखाली लोव्हर बॉडी आणि अपर बॉडीच्या हालचालींचा व्यायाम करत आहे. एस रजनिकांत हे दिल्ली कॅपिटल्सच्या सपोर्ट स्टाफचे सदस्य होते. यापूर्वी त्यांनी हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह व मुरली विजय यांना रिकव्हर केले आहे. तुलसी राम युवराज हे NCA चे फिजिओही रिषभसोबत आहेत. रिषभ सध्या अॅक्वा थेरपी घेतोय... हलकं स्वीमिंग करतोय आणि टेबल टेनिस खेळतोय. डिसेंबर २०२२ मध्ये रिषभ भारताच्या बांगलादेश दौऱ्यावर अखेरचा खेळला होता.

जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आशिया कप खेळणार? 
बुमराह व अय्यर यांच्या पाठीवर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्यांना आयपीएल २०२३ आणि WTC Final खेळता आली नाही. तेही सध्या NCA मध्ये तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत आहेत. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपसाठी दोन्ही खेळाडू उपलब्ध असल्याबद्दल NCA वैद्यकीय कर्मचारी आशावादी आहेत. पाठीला वारंवार दुखापत झालेल्या बुमराहवर मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या ट्वेंटी-२० सामन्यानंतर तो खेळलेला नाही. बुमराह प्रामुख्याने फिजिओथेरपी करत आहे, परंतु अलीकडेच त्याने हलकी गोलंदाजी सुरू केली आहे  
पाठीच्या खालच्या भागात फुगलेल्या डिस्कमुळे त्रस्त झालेल्या श्रेयसला मार्चमध्ये अहमदाबादमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची अंतिम कसोटी खेळता आली नाही. त्यानंतर मे महिन्यात त्याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता त्याची फिजिओथेरपी सुरू आहे.

Web Title: Rishabh Pant's recovery progressing faster than expected; Jasprit Bumrah and Shreyas Iyer are aiming to make a comeback in the 2023 Asia Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.