Rishi Dhawan Face Shield Story, IPL 2022 PBKS vs CSK Live: पंजाब किंग्जचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याने धडाकेबाज खेळी करत संघाला २० षटकांत ४ बाद १८७ धावांपर्यंत मजल मारून दिली. चेन्नईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर आपला २००वा IPL सामना खेळणाऱ्या शिखर धवनने तुफान फटकेबाजी केली. त्याने भानुका राजपक्षेसोबत शतकी भागीदारी केली. धवनच्या ८७ धावांच्या खेळीची चर्चा रंगलीच पण त्यासोबतच रिषी धवनच्या फेस शिल्डचीदेखील चर्चा रंगली.
यंदाच्या हंगामात आपला पहिला IPL सामना खेळणाऱ्या रिषी धवनने पहिल्याच षटकात विकेट घेतली. त्याने चेन्नईचा धडाकेबाज अष्टपैलू शिवम दुबेला बाद केले. सामन्यादरम्यान रिषी धवन फेस शिल्ड घालून क्रिकेट खेळताना दिसला. त्यामागचे काय कारण.. असा सवाल साऱ्यांनाच पडला होता. त्याचे कारण जाणून घेऊया.
रिषी धवनने आपल्या फेस शिल्डची कहाणी सांगितली. "मी ४ वर्षांची IPL मध्ये कमबॅक करतोय. माझ्यासाठी मधली चार वर्षे खूप वेदनादायी होती. रणजी ट्रॉफी दरम्यान माझ्या चेहऱ्याला दुखापत झाली. त्यामुळे मला खूप मोठ्या सर्जरीला सामोरं जावं लागलं. त्यामुळे सुरूवातीच्या सामन्यामध्ये मला खेळता आलं नाही. पण आता मी ट्रेनिंग आणि सराव करून संघात आलो आहे", असं कारण त्याने सांगितलं.
Web Title: Rishi Dhawan is Wearing Safety Shield While Bowling During IPL 2022 PBKS vs CSK match Here is The Reason Why Live
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.