इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या रियान परागने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एक खास विक्रम आपल्या नावावर केला. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या सलग ६ डावात अर्धशतक झळकावणारा पराग हा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. परागने आज सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२३ मध्ये आसामकडून खेळताना केरळविरुद्ध ३३ चेंडूत ५७ धावा करून ही कामगिरी केली. या स्पर्धेत अप्रतिम फॉर्ममध्ये आहे.
परागच्या झंझावाती खेळीमुळे आसामने सामन्यात २ विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात आसामने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या केरळ संघाला २० षटकांत ६ विकेट गमावून केवळ १२७ धावा करता आल्या. केरळसाठी फक्त अब्दुल बासित ४६* धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आसाम आला तेव्हा एकामागून एक विकेट पडत होत्या, मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या परागने चांगला खेळ केला आणि संघाला विजय मिळवून दिला. परागने ५७ धावांची नाबाद खेळी खेळली, त्यात १ चौकार, ६ गगनचुंबी षटकार ठोकले.
रियान परागची सय्यद मुश्ताक अली २०२३ मधील कामगिरी 45(19) & 0/53(4)61(34) & 2/25(4)76*(37) & 3/6(4)53*(29) & 1/17(4)76(39) & 1/37(4)72(37) & 1/35(3)57*(33) & 1/17(4)