नवी दिल्ली : रणजी ट्रॉफीच्या 2022-23 च्या हंगामात भारताचे युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहेत. यामध्ये आसामकडून खेळणाऱ्या रियान परागचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. सध्या चालू हंगामात आसामचा दुसरा सामना हैदराबादविरुद्ध खेळवला जात आहे. ज्यात रियान परागने वादळी खेळी करून अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. आसामचा संघ धावा करण्यासाठी संघर्ष करत असताना रियागने उल्लेखणीय खेळी केली.
परागने हैदराबादच्या गोलंदाजांचा घेतला समाचार 28 डिसेंबर रोजी हैदराबाद आणि आसाम यांच्यातील सामन्याचा दुसरा दिवस होता. प्रथम फलंदाजी करताना आसामने पहिल्या डावात 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने 208 धावांसह 3 धावांची आघाडी घेतली. त्याला प्रत्युत्तर देताना आसामची स्थिती देखील बिकट झाली.
6 षटकार आणि 8 चौकारसलग पडणाऱ्या बळीमुळे आसाम सामन्यात बॅकफूटवर जात असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, यानंतर रियान परागने तुफानी फलंदाजी केली की सगळ्यांचे लक्ष वेधले. अवघ्या 28 चेंडूंचा सामना करत त्याने 78 धावांची खेळी केली. ज्यात 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता, त्याच्या खेळीमुळे आसामच्या संघाने डावात पुनरागमन केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"