Join us  

नुसता राडा! २३ चेंडूंत १२६ धावांचा पाऊस, IPL 2023 आधी राजस्थान रॉयल्सचा फलंदाजानं आणलं वादळ

Riyan Parag : इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा रियान पराग जीपीएल प्रत्येक हंगामात नेहमीच चर्चेचा विषय असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 4:38 PM

Open in App

Riyan Parag : इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा रियान पराग जीपीएल प्रत्येक हंगामात नेहमीच चर्चेचा विषय असतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रियानने  गुवाहाटी प्रीमियर लीगमध्ये १४८ धावांची वादळी खेळी केली. गुवाहाटी प्रीमियर लीगमध्ये BUD CC विरुद्ध नबज्योती क्लब सामना झाला. या सामन्यात BUD CC च्या वतीने खेळताना रियान परागने आपल्या संघाला सावरले. अवघ्या १० धावांत २ गडी गमावल्यानंतर रियान क्रीजवर आला आणि त्याने सामन्याची स्थितीच बदलली.  त्याने १७ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने १४८ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्यामुळे त्याचा संघ २१७ धावांपर्यंत मजल मारू शकला.

रियान आयपीएल 2023 मध्येही राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. आतापर्यंत तो इंडियन लीगमध्ये विशेष काही करू शकलेला नाही. पण गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना धडाकेबाज अर्धशतक ठोकले होते. परागने आतापर्यंत ४७ आयपीएल सामन्यांत ५३३ धावा आणि ४ बळी घेतले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फ‌ॅफ ड्यू प्लेसिस, आकाश दीप, वनिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, फिन अ‌ॅलन, करन शर्मा, एस प्रभुदेसाई, अनुज रावत, सिद कौल, शाहबाज अहमद, रजत पाटिदार, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, जोश हेझलवूड, रिसे टॉप्ली, हिमांशू शर्मा, विल जॅक्स, मनोज भंडागे, राजन कुमार, अविनाश सिंद, सोनू यादव. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :राजस्थान रॉयल्सआयपीएल २०२२टी-20 क्रिकेट
Open in App