कोरोना व्हायरसमुळे यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर अनिश्चिततेचं सावट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी अजूनही आशावादी आहेत. पुढील महिन्यात याबाबतच अंतिम निर्णय येणे अपेक्षित आहे. पण, त्याचवेळी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या निर्णयावर इंडियन प्रीमिअर लीगचेही ( आयपीएल) भवितव्य अवलंबून आहे. त्यामूळे जर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप झाल्यास आयपीएल खेळवणे शक्य होणार नाही आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) 4000 कोटींचे नुकसान सहन करावे लागेल. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन कार्ल एडींग यांनी दिलेल्या अपडेटनंतर बीसीसीआयच्या गोटात आनंदाचे वातावरण नक्की पसरले असेल.
अवघ्या सात मिनिटांत झालो टीम इंडियाचा कोच- गॅरी कर्स्टन
कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान माजवलं आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 81 लाख 18,671 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 39,198 जणांना प्राण गमवावे लागले, तर 42 लाख 16,325 रुग्ण बरे झाले आहेत. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आयसीसीनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. एडींग यांनी सांगितले की,''ट्वेंटी-20 वर्ल्ड कप यंदा होणार नाही किंवा स्थगित करण्यात आला, याबाबतची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोना संकट आहे आणि त्यापैकी 16 देशांतील संघांना आम्ही ऑस्ट्रेलियात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पण, हे वास्तववादी नाही किंवा खूप खूप अवघड आहे.''
बीसीसीआयला आयसीसीच्या निर्णयाची प्रतीक्षा
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप बाबत बीसीसीआयला अजूनही आयसीसीच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत निर्णय घेता येईल. दरम्यान, 10 जूनला आयसीसीच्या बैठकीनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राज्य संघटनांना पत्र पाठवून आयपीएलसाठी तयारी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे एडींग यांच्या विधानानं बीसीसीआयला आनंद झाला आहे. पण, तरीही भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आयपीएलचे आयोजन देशाबाहेर होण्याची शक्यता अधिक आहे. संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका क्रिकेट मंडळानं आयपीएल आयोजनाची तयारी दर्शवली आहे.
Well Done; CSK साठी मोची काम करणाऱ्या भास्करन यांना इरफान पठाणची आर्थिक मदत!
Web Title: Road all-clear for IPL 2020 as CA chairman calls hosting T20 World Cup this year 'unrealistic'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.