पणजी : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा वेगाचा ही चाहता आहे. बऱ्याचदा त्याने आपले गाड्यांवरचे प्रेमही दाखवले आहे. फेरारीसारखी गाडीही सचिनकडे होती. पण गोव्यात सचिनने ऑफ रोड ड्राइव्हिंग केली अन् साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला.
सचिन एका गाडीमध्ये बसला होता आणि ऑफ रोड ड्राइव्हिंग सुरु होती. त्यावेळी सचिनची गाडी एका 7-8 फूट खड्यात होती. तिथून सचिनला ती गाडी वर काढायची होती. त्यावेळी गाडी वर काढण्याच्या प्रयत्न सुरु होता आणि त्यावेळी ती गाडी मागे सरकली. सचिनची गाडी मागे सरकल्यावर एक व्यक्ती गाडीजवळ आला आणि त्याने गाडीला नेमके काय झाले आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
https://www.facebook.com/lokmat/videos/2067908733264329/
क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचे इमले रचणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गोव्यात ‘आॅफ रोड ड्रायव्हिंग’चा आनंद लुटला. त्याने स्वत: ४ बाय ४ जीप चालवत अत्यंत खडतर अशा रस्त्यावरून ड्रायव्हिंग करीत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘ऑफ रोड ड्रायव्हिंग’च्या ट्रॅकवरही सचिनने षटकार ठोकला. एका टायर कंपनीने आयोजित केलेल्या ऑफ रोडिंग इव्हेंटसाठी सचिन गोव्यात आला. केपे या भागात हा कार्यक्रम झाला. यासाठी देशातील विविध भागातील रायडर्स सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजता तो सर्वांपुढे येणार, असे आयोजकांनी सांगितले होते. मात्र, दुपार झाली तरी त्याचे आगमन न झाल्याने अनेकांची निराशा झाली होती. अचानक सचिन स्वत: जीप चालवत येणार असल्याचे जाहीर करताच उत्सुकता शिगेला पोहोचली. अखेर तो आला. जवळपास दीड किलोमीटरचा डोंगर आणि खडकाळ असा रस्ता पार केल्यानंतर तो जीपमधून उतरला तेव्हा ‘सचिन सचिन...’ असा जल्लोष सुरू झाला. त्याची एक झलक टिपण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये चढाओढ सुरू झाली. उद्घाटन झाल्यानंतर सचिन पत्रकार परिषदेत क्रिकेटवर काहीतरी बोलणार अशी अपेक्षा होती. मात्र, तो केवळ ऑफ रोड ड्रायव्हिंगवर’च बोलला. तो म्हणाला की, हा थरारक अनुभव होता. आपण देशात पहिल्यांदाच अशा ट्रॅकवर ड्रायव्हिंग केले आहे. गोव्यात अशा प्रकारचा इव्हेंट पुढेही चालू राहिल्यास आपण नक्की सहभागी होईन. प्रत्येकाच्या आयुष्यात खडतर आव्हानं असतात. ती पार करीत जीवनाचे ध्येय गाठायचे असते.
भारत खेळणारा देश व्हावाआपण खेळात प्रगती करीत आहोत. परंतु, भारत हा ‘स्पोटर््स प्लेर्इंग’ देश नाही. आपण खेळावर प्रेम करणारे आहोत, त्याचे रूपांतर खेळणाºया देशात व्हावे. ज्या देशात केवळ स्पोटर््वर अधिक भर दिला जातो त्यात आपलाही समावेश व्हावा, अशी इच्छा सचिनने व्यक्त केली. या वेळी त्याने भारतातील आरोग्य स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. देश हा ‘हेल्दी आणि फिट’ असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने लोकांमध्ये जागरूकता वाढायला हवी. ज्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करता त्याबद्दल अधिक एकरूप व्हा. नक्कीच यशापर्यंत पोहोचणार. माझ्याही बाबतीत असे झाले आहे. मी क्रिकेटवर खूप प्रेम करत होतो. करत आहे आणि त्यामुळे मला यात यशस्वी होता आले.