Join us  

Corona Virusमुळे ट्वेंटी-२० लीग पुढे ढकलली, मे किंवा ऑक्टोबरमध्ये होणार सामने? 

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 7:34 PM

Open in App

सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, ब्रेट ली आदी दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेली रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धा अखेर पुढे ढकलण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून आयोजकांकडून याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. मात्र, याबाबत गुरुवारी आयोजकांनी तातडीची बैठक बोलावल्याचे वृत्त आहे.  

आरोग्य मंत्रालयाने गर्दी टाळण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेचे उर्वरित सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला गेला होता. तसेच, पुण्यातील सामने नवी मुंबईच्या डी वाय पाटीलला हलवले होते. त्यात संध्याकाळी ही स्पर्धाच रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.

खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर आयोजक ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करणार आहेत. या लीगचे उर्वरित सामने मे किंवा ऑक्टोबरमध्ये खेळवण्यात येतील. पण, खेळाडू कधी उपलब्ध आहेत, त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरण, मार्वन अटापट्टू आणि रंगना हेरथ यांनी भारत सोडला आहे. अन्य परदेशी खेळाडू येत्या दोन दिवसांत मायदेशात परततील, अशी माहिती आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक

Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका

मोठा निर्णय, सचिन-वीरूची फलंदाजी प्रत्यक्ष पाहता येणार नाही!

OMG : आंतरराष्ट्रीय खेळाडूला Corona Virusची लागण, संपूर्ण लीग करावी लागली रद्द

BCCI ची कोंडी; IPL 2020 चा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन

टॅग्स :कोरोनासचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवाग