युवराज सिंग ( Yuvraj Singh) पुन्हा 2007च्या फॉर्मात दिसला. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या ( Road Safety World Series) शनिवारी झालेल्या सामन्यात इंडिया लिजंड ( India Legends) संघाकडून खेळणाऱ्या युवीनं सलग चार षटकार खेचून 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इंग्लंडविरुद्धच्या आठवणी ताज्या केल्या. दक्षिण आफ्रिका लिजंड ( South Africa Legends) संघाविरुद्ध युवीनं 22 चेंडूंत नाबाद 52 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर इंडिया लिजंड संघानं 20 षटकांत 3 बाद 204 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात सचिन तेंडुलकरनं ( Sachin Tendulkar) अर्धशतकी खेळी केली.
झँडर डी ब्रूयन याच्या एका षटकात सलग चार षटकारयुवीनं डावाच्या 18व्या षटकात झँडर डी ब्रूयनच्या एका षटकात सलग चार षटकार खेचले. त्यानं 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकार सहा षटकार खेचून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. आजच्या सामन्यात ब्रूयनच्या षटकाच्या आधी युवीनं 12 चेंडूंत 15 धावा केल्या होत्या. पण, त्यानंतर त्याची धावसंख्या 18 चेंडूंत 39 अशी झाली. अखेरच्या षटकात गार्नेट क्रुगरच्या गोलंदाजीवर षटकार खेचून युवीनं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं 22 चेंडूंत 2 चौकार व 6 षटकार खेचून नाबाद 52 धावा केल्या.