Road Safety World Series : पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार... पहिल्या षटकात 19 धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागची ( Virender Sehwag) ही स्टाईल आजही कायम आहे. निवृत्तीनंतरही वीरूच्या फलंदाजीचा जलवा तसाच कायम असलेला पाहायला मिळाला. सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) नॉन स्ट्राईकर एंडला उभा राहून वीरूच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीचा आस्वाद लुटत होता. ( Virender Sehwag 80*(35) and Sachin Tendulkar 33*(26)) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या पहिल्याच सामन्यात इंडिया लिजंड ( India Legends) संघानं दणक्यात विजय साजरा केला. युवराज सिंगनंही ( Yuvraj Singh) दोन विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वीरूच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं 10.1 षटकांत बांगलादेश लिजंड ( Bangladesh Legends) संघावर 10 विकेट्स राखून विजय मिळवला. ( India Legends beat Bangladesh Legends by 10 wickets)
त्यानं 35 चेंडूंत 10 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 80 धावा केल्या. सचिन तेंडुलकर 26 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीनं 33 धावांवर नाबाद राहिला. वीरूनं सुरुवात चौकारानं केली, तर शेवट षटकारानं केला. त्याच्या 80 धावांमधील 70 धावा या फक्त चौकार-षटकारांनी आल्या.