भारतीय फलंदाज शुभमन गिल याने निर्णायक ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धू धू धुतले. गिलने ट्वेंटी-२०तील त्याचे पहिले वैयक्तिक शतक झळकावताना मोठ्या विक्रमाची नोंद केली. भारताने ४ बाद २३४ धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर गोलंदाजांनी किवींचा संपूर्ण संघ ६६ धावांवर माघारी पाठवला. भारताने १६८ धावांनी हा सामना जिंकून इतिहास घडविला. शुभमनला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. या सामन्यानंतर शुभमनने गुरुवारी एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात इशान किशन व युझवेंद्र चहल त्याच्या सोबत दिसत आहे.
शुभमन गिलने १२ चौकार व ७ षटकारांसह १२६ धावांवर नाबाद राहिला अन् भारताने ४ बाद २३४ धावा केल्या. ट्वेंटी-२० त भारताकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विराट कोहलीचा ( १२२ वि. अफगाणिस्तान, २०२२ ) विक्रम शुभमनने मोडला. कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक किमान एक शतक झळकाणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. सुरेश रैना, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली यांनी हा पराक्रम केला आहे. कसोटी, वन डे व ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक किमान एक शतक झळकाणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. सुरेश रैना, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली यांनी हा पराक्रम केला आहे.
राहुल त्रिपाठीने २२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावा, सूर्यकुमार यादवने २४ धावा आणि हार्दिकने १७ चेंडूंत ३० धावा करून योगदान दिले. हार्दिकने गोलंदाजीतही कमाल केली. त्याने १६ धावा देताना चार विकेट्स घेतल्या. उम्रान मलिका ( २-९), शिवम मावी ( २-१२) आणि अर्शदीप सिंग ( २-१६) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.