मुंबईः भारतीय संघाचा माजी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक रॉबीन सिंग याने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. रॉबीनने 2007 ते 2009 या कालावधीत भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली होती. गॅरी कर्स्ट्न यांची प्रशिक्षकपदी निवड होण्यापूर्वी रॉबीन आणि गोलंदाज प्रशिक्षक वेंकटेश प्रसाद यांनी काही काळ भारतीय संघाला मार्गदर्श केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने 2007मध्ये तिरंगी वन डे मालिका, पहिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलियात वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.
रॉबीनने भारताच्या 19 वर्षांखालील, अ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे, शिवाय इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचा तो साहाय्यक प्रशिक्षक आहे. तसेच कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये तो बार्बाडोस ट्रायडेंट्स संघाचे प्रशिक्षकपदही त्याच्याकडे होते.
रॉबीन म्हणाला,''रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सलग दुसऱ्यांना भारतीय संघाला वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. शिवाय ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या मागील चार सत्रातही तोच अनुभव आला. 2023च्या वर्ल्ड कपच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करायला हवे आणि बदल संघाच्या फायद्याचे ठरेल.''
रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम राहणार? अंशुमन गायकवाड यांनी दिले सूचक संकेत
वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षक बदलाच्या हालचालींनी जोर धरला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पण, तत्पूर्वी कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत 45 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांच्या फळीत बरेच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या मार्गदर्शनाखालील त्रिसदस्यीत समिती मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. या समितीत कपिल देव यांच्यासह माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे. या समितीतील गायवकाड यांनी शास्त्री यांच्या भविष्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. ''टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख पाहता शास्त्री यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्यामुळे शास्त्री वगळता अन्य पदांसाठी पर्याय निवडण्याचा मार्ग मोकळा आहे. या पदांसाठी बीसीसीआयनं नेमलेल्या अटींची जो पूर्तता करेल, त्याची निवड होईल.''
Web Title: Robin Singh applies for India cricket team head coach job
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.