सुरेश रैना पाठोपाठ भारताच्या सलामीवीरानं मागितली परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी

बिग बॅश लीग, दी हंड्रेज, मॅझन्सी सुपर लीग आणि अनेक लीग आज जगभरात खेळल्या जात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:19 PM2020-05-22T12:19:08+5:302020-05-22T12:20:13+5:30

whatsapp join usJoin us
Robin Uthappa urging the BCCI to allow players to play in foreign T20 leagues svg | सुरेश रैना पाठोपाठ भारताच्या सलामीवीरानं मागितली परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी

सुरेश रैना पाठोपाठ भारताच्या सलामीवीरानं मागितली परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

झटपट क्रिकेट म्हणून आता चाहते ट्वेंटी-20 लीगला अधिक पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये ट्वेंटी-20 लीग खेळवल्या जात आहेत. त्यातून खेळाडूंसह आयोजकांनाही भरपूर आर्थिक फायदा होतोय... पण, भारतीय क्रिकेटपटूंना फक्त इंडियन प्रीमिअर लीगमध्येच खेळता येत आहे. त्यांना परदेशातील लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) नियमानुसार केवळ निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंनाच परदेशातील लीगमध्ये खेळण्याची परवानगी आहे. पण, आता भारताचा सलामीवीर रॉबीन उथप्पानं बीसीसीआयनं नियम बदलावा आणि खेळाडूंना परदेशातील लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.

आयपीएलनंतर बिग बॅश लीग, दी हंड्रेज, मॅझन्सी सुपर लीग आणि अनेक लीग आज जगभरात खेळल्या जात आहेत. पण, यामध्ये भारताच्या  खेळाडूंना सहभाग घेता येत नाही. करारबद्ध नसलेल्या खेळाडूंनाही परदेशी लीगमध्ये सहभाग घेता येत नाही. उथप्पा म्हणाला,''कृपया आम्हाला खेळण्याची परवानगी द्या. आम्हाला परदेशातील लीगमध्ये खेळण्यास न मिळाल्यानं दुःख होतं. माझ्यासह अनेकांना या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळायला हवी. तुम्ही जास्त खेळात, तर जास्त शिकाल. ''

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हा प्रश्न सोडवतील, अशी आशा उथप्पानं व्यक्त केली. तो म्हणाला,''गांगुली प्रगतीच्या दिशेनं विचार करणारा माणूस आहे. तो भारतीय क्रिकेटला आणखी एका उंचीवर घेऊन जाऊ शकतो. त्यानं भारती क्रिकेटचा पाया रचला आहे. आशा करतो की हाही प्रश्न तो सोडवेल.''

यापूर्वी सुरेश रैनानेही परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, असा मुद्दा उपस्थित केला होता.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

नशीबाचं चक्र फिरलं; आजारी वडिलांना घेऊन 1200 किमी प्रवास करणाऱ्या ज्योतीसाठी आनंदवार्ता

... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर 

Video : दहा दिवसांचा पंतप्रधान बनवल्यास काय करशील? शाहिद आफ्रिदीनं सांगितली दोन टार्गेट!

टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या बहिणीचा भोजपुरी गाण्यावर डान्स, Video Viral 

Cricket is Back; कॅरेबियन बेटावर आजपासून दहा दिवस रंगणार क्रिकेटचा थरार!

Web Title: Robin Uthappa urging the BCCI to allow players to play in foreign T20 leagues svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.