नवी दिल्ली : सोशल मीडियावर २०१२ साली लिंगभेद व वंशभेदप्रकरणी केलेल्या ट्विटप्रकरणी इंग्लंडने वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला निलंबित केले. त्याच्याप्रती भारताचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने सहानुभूती व्यक्त केली. ‘रॉबिन्सनवर झालेली कारवाई सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणाऱ्या भावी पिढीसाठी एक इशाराच आहे,’ असेही अश्विनने म्हटले.वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला निलंबित करत इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी) रविवारी सांगितले की, ‘गुरुवारी सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी रॉबिन्सन उपलब्ध नसेल. या २७ वर्षीय खेळाडूला २०१२ - १३ मध्ये केलेल्या भेदभावपूर्ण ट्विटची चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रॉबिन्सनचे निलंबन भावी पिढीसाठी इशाराच - रविचंद्रन अश्विन
रॉबिन्सनचे निलंबन भावी पिढीसाठी इशाराच - रविचंद्रन अश्विन
Ravichandran Ashwin : वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला निलंबित करत इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी) रविवारी सांगितले की, ‘गुरुवारी सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी रॉबिन्सन उपलब्ध नसेल.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 4:48 AM