अॅडिलेड : भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधील वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा नाबाद ४०० धावांचा विक्रम मोडू शकतो असे मत आॅस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने व्यक्त केले आहे.वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटीत नाबाद ३३५ धावा करत कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. लाराचा विक्रम मोडण्यास त्याला फक्त ६५ धावा गरजेच्या असताना कर्णधार टीम पेन याने आॅस्ट्रेलियाचा डाव घोषित केला.वॉर्नरला लाराचा विक्रम मोडता आला नाही मात्र, ४०० धावा करणे शक्य असल्याचे त्याने म्हटले. नजीकच्या काळात रोहित शर्मा असे करु शकेल असे त्याचे मत आहे. लाराने इंग्लंडविरुद्ध खेळताना कसोटीमध्ये नाबाद ४०० धावांचा विक्रम नोंदवला आहे.वॉर्नर म्हणाला,‘ हे खेळाडूवर अवलंबून असते. आमच्याकडे सिमारेषा खूप लांब आहेत. कधीकधी तुम्ही लवकर थकता, त्यामुळे मोठे फटके मारणे कठीण होते. ’ तो म्हणाला, ‘ शेवटी शेवटी मी दोन धावा करण्यासाठी जास्त प्रयत्न करत होतो, कारण मी चौकार मारू शकेन असे मला वाटत नव्हते.’वॉर्नर म्हणाला, ‘लाराचा विक्रम मोडू शकेल असे कोणाचे नाव घ्यायचे असेल तर मी रोहित शर्माचे घेईन. रोहित निश्चितपणे असे करु शकतो.’ तो म्हणाला, ‘आयपीएलच्या सामन्यादरम्यान विरेंद्र सेहवाग याने मला तू टी-२० किंवा एकदिवसीय सामन्यापेक्षा चांगला कसोटीपटू होऊ शकतो असे सांगितले होते. ’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रोहित मोडू शकतो ब्रायन लाराचा विक्रम - डेव्हिड वॉर्नर
रोहित मोडू शकतो ब्रायन लाराचा विक्रम - डेव्हिड वॉर्नर
वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटीत नाबाद ३३५ धावा करत कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 4:10 AM