Join us  

रोहित-कोहली मोडणार का गांगुलीचा विक्रम?

संडे अ‍ॅँकर । विश्वचषक क्रिकेट । २० वर्षांपूर्वी रचला होता गांगुलीने भारताकडून सर्वोच्च धावांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 4:09 AM

Open in App

नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन विक्रमांची नोंद आहे. तर विराट कोहली भारताची रनमशीन समजला जातो. या दोन्ही खेळांडूच्या निशाण्यावर भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सौरव गांगुली याचा २० वर्षे जुना विक्रम असेल. सौरव गांगुलीने १९९९ मध्ये श्रीलंकेविरोधात १८३ धावा केल्या होत्या. भारताकडून यानंतर कोणत्याही फलंदाजाला विश्वचषकात यापेक्षा जास्त धावसंख्या करता आली नाही.रोहित प्रमाणेच शिखर धवन आणि विराट कोहली यांचेही लक्ष्य गांगुलीच्या या विक्रमाकडे असेल. मोठी खेळी करून हे तिन्ही फलंदाज गांगुलीचा हा विक्रम मोडण्यास नक्की उत्सुक असतील.

दर चार वर्षांनी होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेत दोन दुहेरी शतके देखील झाली आहेत. मात्र भारताकडून गांगुलीच्या धावाच सर्वोच्च आहेत. विश्वचषकात त्यानंतर केवळ दोन वेळाच भारतीय फलंदाजांना १५०चा आकडा पार करता आला आहे. विरेंद्र सेहवागकडे गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी होती मात्र २०११ मध्ये बांगलादेशविरोधात तो १७५ धावा करून परतला. तर २००३ मध्ये सचिन तेंडुलकरने नामिबियाविरोधात १५२ धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले दुहेरी शतक झळकावणाºया सचिन तेंडुलकरचा विश्वचषकातील या सर्वोच्च धावा आहेत. इंग्लंडमधील खेळपट्ट्या या वेळी फलंदाजांसाठी सर्वात जास्त अनुकुल आहेत. आणि एका डावात ५०० पेक्षा जास्त धावा देखील बनु शकतात. अशा परिस्थतीत भारतीय फलंदाजांकडून जास्त अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. यात रोहित याने सर्वाधिक ७ वेळा १५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याचा २६४ धावांचा विश्वविक्रम आहे.धवन याने मेलबर्नमध्ये २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात १३७ धावा केल्या होत्या. विश्वचषकातील ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.गांगुलीच्या १८३ सर्वोच्च धावाभारताकडून आतापर्यंत सौरव गांगुली याने विश्वचषक १९९९ मध्ये केलेल्या १८३ या सर्वोच्च धावा आहेत. हा विक्रम आतापर्यंत भारतीय फलंदाजांना मोडता आला नाही.

टॅग्स :सौरभ गांगुली