विराटसारख्या रोहित उड्या मारत नाही... ! कपिल देव यांच्याकडून हिटमॅनच्या कॅप्टनसीचे कौतुक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. पण, या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 08:08 PM2024-06-26T20:08:25+5:302024-06-26T20:08:52+5:30

whatsapp join usJoin us
"Rohit never jumps like Virat, some big player plays for themselves but Rohit keeps entire team happy", Kapil Dev Takes Dig At Kohli, Hails Rohit Sharma's Captaincy | विराटसारख्या रोहित उड्या मारत नाही... ! कपिल देव यांच्याकडून हिटमॅनच्या कॅप्टनसीचे कौतुक

विराटसारख्या रोहित उड्या मारत नाही... ! कपिल देव यांच्याकडून हिटमॅनच्या कॅप्टनसीचे कौतुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना २७ जून रोजी गयाना येथे होणार आहे. यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. पण, या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो. सेमीफायनल सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माला सूर गवसला आहे, तर विराट कोहलीची बॅट अजूनही शांत आहे. त्यावरूनच भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव यांनी रोहित आणि विराटचे नाव घेत मोठे वक्तव्य केले आहे.


१९८३ चा वन डे वर्ल्ड कप जिंकणारे भारताचे चॅम्पियन कर्णधार कपिल देव एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले की, रोहित शर्मा विराट कोहलीप्रमाणे कधीही उड्या मारत नाही आणि त्याला त्याच्या मर्यादा माहित आहेत. मला वाटते की रोहित शर्माला त्याचा खेळ आणि त्याला काय करायचे आहे, हे माहित आहे. रोहितपेक्षा चांगला कोणी नाही. अनेक मोठे खेळाडू येतात आणि स्वत:साठी खेळतात. पण, रोहित एक पाऊल पुढे आहे, तो संपूर्ण संघाला सोबत घेऊन जातो आणि संघातील सर्व खेळाडू त्याच्यावर खूश असतात.


टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिली आहे. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमध्ये अमेरिका, आयर्लंड आणि पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर Super8 मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता टीम इंडियाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे. २०१३ पासून सुरू आयसीसी स्पर्धेतील ट्रॉफीचा दुष्काळ भारताला संपवायचा आहे.  

Web Title: "Rohit never jumps like Virat, some big player plays for themselves but Rohit keeps entire team happy", Kapil Dev Takes Dig At Kohli, Hails Rohit Sharma's Captaincy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.