Join us  

Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?

Rohit Sharma Rohit Pawar Karjat Jamkhed Visit: रोहित शर्मा कर्जत जामखेडमध्ये क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करायला आला असताना रोहित पवारांनी त्याच्याशी जाहीर संवाद साधला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 7:22 PM

Open in App

Rohit Sharma Rohit Pawar Karjat Jamkhed Visit: T20 World Cup 2024 ची फायनल... भारताने सामना जिंकला अन् त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका मुंबईकर कर्णधार रोहित शर्मा याने विश्वचषक उंचावला. संपूर्ण भारताला त्या दिवशी या क्षणाचा अभिमान वाटला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने तब्बल १३ वर्षांचा वर्ल्डकपचा दुष्काळ संपवला. त्यानंतर रोहितने टी२० तून निवृत्ती घेतली. पण तो कसोटी आणि वनडे मध्ये अजूनही दमदार कामगिरी करताना दिसतोय. बांगलादेशला २-०ने कसोटी मालिकेत हरवणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आज महाराष्ट्राच्या नगरमधील कर्जत-जामखेडमध्ये आला. यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा रोहित पवारांनी रोहित शर्माकडे प्रत्येक भारतीयाच्या मनात असलेली मागणी केली.

स्टेजवर नक्की काय झालं?

रोहित आज कर्जत जामखेडमध्ये क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यासाठी उपस्थित राहिला. त्यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार उपस्थित होते. दोन्ही रोहितने एकमेकांशी आणि जनतेशी संवाद साधला. त्यावेळी रोहित पवारांनी रोहित शर्माकडे एक मागणी केली. "अख्ख्या भारताकडून एक विनंती रोहितभाऊंना करतो, हम को और एक वर्ल्डकप चाहिये... आणि तो वर्ल्डकप घेत असताना आम्हाला कॅप्टन म्हणून तुम्हाला बघायचंय. त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही आपल्या देशासाठी आणखी एक वर्ल्डकप घेऊन यावा," असे रोहित पवार म्हणाले. यावर रोहित शर्मा गोड हसला आणि त्याने जमलेल्या चाहत्यांच्या मागणीला 'मूकसंमती' दिली. पाहा त्यावेळचा व्हिडीओ-

दरम्यान, आज रोहितच्या हस्ते कर्जत जामखेड येथील राशीन गावात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन झाले. ही अकादमी रोहित शर्मा सुरू करत असून, ग्रामीण भागातील त्याची पहिलीच अकादमी आहे. ही अकादमी रयत शिक्षण संस्थेच्या जागेत आहे. त्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने रोहित पवार उपस्थित होते. रोहित शर्माला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली. रोहितने आपल्या मराठमोळ्या चाहत्यांशी मराठीतून संवाद साधला.

मराठीतून बोलताना रोहित काय-काय म्हणाला?

रोहित शर्मा म्हणाला, "अलीकडेच आम्ही आमचे मोठे लक्ष्य गाठत भारतासाठी ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला. विश्वचषक जिंकल्यावर माझ्या जीवात जीव आला. पण, मी आज इथे कशासाठी आलोय हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. क्रिकेट हा खेळ सर्वांनाच आवडतो. इथे आम्ही क्रिकेट अकादमी सुरू करतो आहोत. मला खात्री आहे की, पुढचे यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, जसप्रीत बुमराह सगळे इथूनच येतील. माझे मराठी एवढेच होते. तुम्ही सर्वांनी भरपूर प्रेम दिल्याबद्दल आभार. इथे पुन्हा येण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन."

टॅग्स :रोहित शर्मारोहित पवारट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024कर्जत-जामखेड