Akash Madhwal Rohit Sharma Hardik Pandya, IPL 2024 MI vs PBKS: मुंबई इंडियन्सने गुरुवारच्या सामन्यात पंजाब किंग्जवर रोमहर्षक विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) 78 धावांच्या बळावर मुंबईने 192 धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. ५० धावांमध्ये त्यांनी पाच गडी गमावले होते, पण आशुतोष शर्मा, शशांक सिंग आणि हरप्रीत ब्रार यांनी दिलेल्या झुंजीमुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. शेवटच्या षटकात अखेर मुंबईने नऊ धावांनी विजय मिळवला. शेवटचे षटक सुरू होण्याआधी आकाश मधवाल याला गोलंदाजीसाठी आणण्यात आले. त्या वेळेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.
नक्की काय घडले?
पंजाब किंग्सला शेवटच्या षटकात 12 धावांची गरज होती. मुंबई इंडियन्सकडून आकाश मधवाल याला शेवटचे षटक टाकण्यासाठी पाचारण करण्यात आले. षटक सुरू करण्याआधी आकाश हा रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्याबरोबर उभा होता. चेंडू कुठे टाकावा, फिल्डिंग कशी असावी यावर त्यांची चर्चा सुरू होती. पण व्हिडिओमध्ये नीट पाहिल्यास तुम्हाला पाहता येईल की आकाश हा हार्दिक पांड्याने सांगितलेलं काही ऐकत नसून रोहित शर्माकडे पूर्णपणे लक्ष देत होता. आकाशने हार्दिकला पूर्णपणे दुर्लक्षित करून रोहितचा सल्ला मानला अशा प्रकारची ट्विट्स सोशल मीडियावर फॅन्सकडून केली जात आहेत. हा व्हिडीओदेखील तुफान व्हायरल झाला आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादव ने 53 चेंडूत 78 धावा, रोहित शर्माने 25 चेंडूत 36 धावा तर तिलक वर्माने 18 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या. पंजाबकडून हर्षल पटेलने तीन बळी घेतले. 193 धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सकडून आशुतोष शर्माने 28 चेंडूत 61 धावांची दमदार खेळी केली. शशांक सिंग याने 25 चेंडूत 41 धावा तर हरप्रीत ब्रारने 20 चेंडूत 21 धावांची खेळी करत अशुतोषला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे पंजाब किंग्सचा निभाव लागू शकला नाही. मुंबईकडून बुमराहने आणि गेराल्ड कोईत्झे दोघांनी ३-३ बळी घेतले.
Web Title: Rohit Sharma Akash Madhwal Final Over Chat ignored Hardik Pandya Presence video Goes Viral IPL 2024 MI vs PBKS
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.