ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर विराट कोहली ( Virat Kohli) नेतृत्वाची जबाबदारी सोडणार, या सर्व अफवा आहे असे छातीठोकपणे सांगणारी बीसीसीआय आज तोंडावर आपटली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानेच आगामी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाचे नेतृत्व सोडणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. त्यामुळे कोहली समर्थक निराश झाले असले, तरी रोहित शर्मा (Rohit Sharma) चे चाहते मात्र आनंदात असतील. ३५ वर्षीय रोहित ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचा कर्णधार बनेल अशी शक्यता आता वाढली आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहितकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सहज जाईल असे वाटत असले, तरी थोडं थांबा. ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत तो एकटाच शिलेदार नाही, तर त्याला टक्कर देणारे दोन खेळाडू संघात आहेत.
Breaking News :वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीनं केलं जाहीर
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ट्वेंटी-२०त ४५ सामन्यांत २७ विजय व १४ पराभव पत्करले आहेत. वर्क लोड लक्षात घेता विराटनं ट्वेंटी-२० संघात फक्त आता फलंदाज म्हणून खेळण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे रोहितचा मार्ग मोकळा झाला आहे. रोहितनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १९ सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले आणि त्यापैकी १५ मध्ये विजयही मिळवले. त्यामुळे तोच कर्णधार होईल याची शक्यता अधिक आहे, पण त्याचं वय हे त्याच्या नेतृत्वाच्या आड येऊ शकतं. रोहित आता ३५ वर्षांचा आहे आणि भविष्याच्या संघबांधणीच्या दृष्टीनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर भारतीय संघाचा कर्णधार हा युवा असावा जेणेकरून त्याला पुढील वर्ल्ड कपपर्यंत पुरेसा अनुभव मिळेल. त्यामुळे रिषभ पंत ( Rishabh Pant) व लोकेश राहुल ( KL Rahul) ही दोन नावं समोर आली तर आश्चर्य वाटायला नको. ही रिषभ व लोकेश आयपीएलमध्ये अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स व पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व सक्षमपणे पेलत आहेत.
Big News : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण?; फ्रँचायझीनं अखेर आज केली घोषणा
रोहित शर्मा कर्णधार बनल्यास तीन खेळाडूंवर येईल संक्रात, नाव जाणून बसेल धक्का
- रिषभ पंत - रोहित शर्मा ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनल्यास तो सर्वात प्रथम रिषभ पंतला डच्चू देऊन इशान किशनला संधी देऊ शकतो. इशान किशन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो आणि त्याची कामगिरी वाखाण्यजोगी आहे. अशात रिषभचे स्थान संकटात आहे.
- नवदीप सैनी - टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटच्या संघात नवदीप सैनीचा समावेश असतो, परंतु त्याला फारशी संधी मिळालेली नाही. रोहित कर्णधार झाल्यास नवदीपच्या जागी नव्या युवा गोलंदाजाला संधी देऊ शकतो
- वॉशिंग्टन सुंदर - अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हा विराटचा आवडता खेळाडू आहे. तो वन डे , ट्वेंटी-२० व कसोटी संघाचा सदस्य आहे, पण, रोहित त्याच्याजागी कृणाल पांड्या किंवा जयंत यादव यांना संधी देऊ शकतो.
विराटनं काय म्हटलं?भारतीय संघाचे फक्त प्रतिनिधित्वच नव्हे तर नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. या प्रवासात मला पांठिबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. सहकारी खेळाडू, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता.
कामाचा ताण हा महत्त्वाचा भाग आहे आणि मागील ८-९ वर्षांपासून तीनही फॉरमॅटमध्ये वर्कलोड वाढला आहे आणि ५-६ वर्षांपासून मी नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत आहे. त्यामुळे मला आता स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून मी वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलू शकेन. ट्वेंटी-२०त मी टीम इंडियासाठी सर्वोत्तम दिले आणि पुढेही फलंदाज म्हणून योगदान देत राहीन.
रवी भाई, रोहित आणि जवळच्या प्रत्येक व्यक्तीशी मी चर्चा केली. त्यानंतरच मी हा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर मी कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. याबाबत मी सचिव जय शाह व अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही चर्चा केली.