Rohit Sharma wife Ritika, Happy Holi: रोहित शर्माने Mumbai Indians चा एक Video बनवण्यासाठी घेतले ५३,२६१ रिटेक? अखेर पत्नी रितिका मदतीला धावली... पाहा धमाल

व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच हसू आवरणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 12:06 PM2022-03-18T12:06:43+5:302022-03-18T12:08:23+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma and Wife Ritika Sajdeh Comedy Video Mumbai Indians Happy Holi Wishes 53261 retakes on shoot hilarious watch  | Rohit Sharma wife Ritika, Happy Holi: रोहित शर्माने Mumbai Indians चा एक Video बनवण्यासाठी घेतले ५३,२६१ रिटेक? अखेर पत्नी रितिका मदतीला धावली... पाहा धमाल

Rohit Sharma wife Ritika, Happy Holi: रोहित शर्माने Mumbai Indians चा एक Video बनवण्यासाठी घेतले ५३,२६१ रिटेक? अखेर पत्नी रितिका मदतीला धावली... पाहा धमाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma wife Ritika, Happy Holi: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खूपच खुश आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि सर्वच्या सर्व सामने भारताने जिंकले. आता रोहित २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL 2022 मध्ये Mumbai Indians संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच रोहित मुंबईतील हॉटेलमध्ये दाखल झाला आणि संघाच्या बायो-बबलमध्ये दाखल झाला. त्याच ठिकाणचा एक धमाल व्हिडीओ सध्या सगळ्यांचं मनोरंजन करत आहे.

भारतासह देशभरात आज होळी, धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. भारताच्या विविध विभागात तब्बल दोन वर्षांनी दणक्यात धुळवड साजरी केली जात आहे. तशातच रोहितला सर्व मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ बनवायचा होता. पण त्याला काही केल्या जमेना... अखेर त्याची पत्नी रितिका त्याच्या मदतीला धावली अन् अखेर व्हिडीओ शूट झाला. या व्हिडीओसाठी रोहितने ५३ हजार २६१ रिटेक घेतल्याचं मुंबई इंडियन्सने मजेत लिहिलं. तितके रिटेक रोहितने प्रत्यक्षात घेतले नसले तरी त्याची बरीच धांदल उडाल्याचं दिसलं. पाहा तो धमाल व्हिडीओ-

दरम्यान, IPL 2022 चा सलामीचा सामना २६ मार्चला होणार आहे. गेल्या वर्षीचे विजेते चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि उपविजेते कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात हा सामना रंगणार आहे. त्यानंतर २७ मार्चला मुंबई इंडियन्सचा दिल्ली संघाविरूद्ध पहिला सामना खेळणार आहे.

Web Title: Rohit Sharma and Wife Ritika Sajdeh Comedy Video Mumbai Indians Happy Holi Wishes 53261 retakes on shoot hilarious watch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.