भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियानं आपला संघ आधीच जाहीर केला. वेस्ट इंडिजनं शुक्रवारी सॉलिड संघ मैदानावर उतरवला. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं शुक्रवारी भारत दौऱ्यावर येणाऱ्या संघाची घोषणा केली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून वेस्ट इंडिजनं हा संघ जाहीर केला आहे. वन डे आणि ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी किरॉन पोलार्डच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. याच पोलार्डनं टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माची झोप उडवली आहे आणि त्यामुळे हिटमॅन रागानं लालेलाल झाला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात प्रत्येकी तीन ट्वेंटी-20 आणि वन डे सामने खेळवण्यात येणार आहे. 6 डिसेंबरला पहिला ट्वेंटी-20 सामना हैदराबाद येथे खेळवण्यात येईल. त्यानंतर 8 डिसेंबर आणि 11 डिसेंबर असे सामने होतील. वन डे मालिकेतील सामने 15, 18 आणि 22 डिसेंबरला खेळवण्यात येतील. पण, या मालिकेपूर्वीच दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्यातील या युद्धाचीच चर्चा रंगत आहे.
पोलार्डनं मालिकेपूर्वी रोहितला सोशल मीडियावर अनफॉलो करून वादाची सुरुवात केली. या मालिकेचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीनं एक जाहीरात तयार केली आहे. त्यात रोहित विंडीजच्या पोलार्डला घेण्यासाठी विमानतळावर जातो आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर पोलार्डला सामनासकट गाडीतून उतरवतो.
याच जाहिरातीचा पुढचा भाग प्रक्षेपित करण्यात आला. त्यात हॉटेलच्या रिसेप्शनला हाताशी धरून पोलार्ड रोहितला पहाटे चार वाजता झोपेतून उठवत आहे. त्याच्या या कृतीनं रोहित चांगलाच रागानं लालेलाल झाला.
पाहा व्हिडीओ...
Web Title: Rohit Sharma 'angered' by Kieron Pollard's antics ahead of India vs West Indies series opener
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.