Join us  

Rohit Sharma Ishan Kishan Viral Photo : Mumbai Indiansने १५.२५ कोटींना विकत घेतलेल्या इशान किशनची रोहित शर्माने सामना संपल्यावर मैदानातच घेतली शाळा, फोटो व्हायरल (Ind vs WI 1st T20)

रोहितने १९ चेंडूत ४० धावा कुटल्या, पण इशान १२व्या षटकापर्यंत खेळूनही ३५ धावाच करू शकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 2:58 PM

Open in App

Rohit Sharma Ishan Kishan Viral Photo, India vs West Indies 1st T20:  टीम इंडियाने पहिल्या टी२० सामन्यात दमदार विजय नोंदवला. भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटी खर्चून विकत घेतलेल्या इशान किशनची मैदानातच शाळा घेतल्याचं दिसून आलं. सामना संपल्यानंतर रोहित शर्माइशान किशनशी बोलताना आणि त्याला काही गोष्टी समजावताना दिसला. रोहित सतत बोलत होता आणि इशान किशन हात मागे ठेवून आणि ​​डोकं खाली करून त्याचं बोलणं ऐकत होता.

रोहित शर्मासोबत सलामीला उतरलेला इशान किशन पहिल्या टी२० मध्ये फलंदाजी करताना गोंधळून गेल्याचं दिसत होतं. इशान किशन हा एक स्फोटक डावखुरा सलामीवीर असूनही तो बराच वेळ भांबावल्यासारखा खेळताना दिसला. इशानने ३५ धावा केल्या, पण टी२० सामन्यात त्याला या धावा करण्यासाठी ४२ चेंडू खेळावे लागले. इशान किशनचा स्ट्राईक रेटही ८३ होता. तो ४२ धावांच्या खेळीत केवळ ४ चौकारच मारू शकला. इशान हा फसलेला खेळ पाहता रोहितने त्याची शाळा घेत त्याला नीट समजावून सांगितलं असं त्या फोटोमध्ये दिसत असल्याची चर्चा आहे.

इशान किशनला फलंदाजीत खूप अडचणी आल्या. झटपट एकेरी धावा घेत स्ट्राईक बदलत राहणं त्याला जमत नव्हतं. इशान किशनला धावा करता येत नसल्याने फॅबियन ऍलनच्या गोलंदाजीवर खराब फटका खेळून तो बाद झाला. इनसाइड स्पोर्टच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्माने इशान किशनला मोकळेपणाने खेळण्यास सांगितले. स्ट्राईक रोटेट करण्यावर भर देण्याचा सल्लाही दिली. तसेच कोणतेही दडपण येऊ न देता खेळत राहा असंही सांगितलं.

c

सामन्यानंतर बोलताना मात्र रोहित शर्माने इशान किशनचा बचाव केला. खेळपट्टीवर पटकन धावा करणं कठीण असतं. इशानला काही सामने खेळण्याची गरज आहे. त्याच्यावर सध्या खूप दबाव आहे, असं रोहित म्हणाला. दरम्यान, इशान किशनने सुरुवात खूपच संथ केली. तो १२व्या षटकापर्यंत क्रीजवरच होता, पण तरीही त्याला केवळ ३५ धावाच करता आल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माइशान किशनभारतीय क्रिकेट संघ
Open in App