Rohit Sharma: लाईव्ह सामन्यात भुवनेश्वर आणि अर्शदीपवर रोहित शर्माचा 'पारा' चढला; व्हिडीओ व्हायरल

आशिया चषकात भारतीय संघाला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 01:18 PM2022-09-07T13:18:24+5:302022-09-07T13:20:28+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma angry with Bhuvneshwar Kumar and Arshdeep Singh in live match, video goes viral | Rohit Sharma: लाईव्ह सामन्यात भुवनेश्वर आणि अर्शदीपवर रोहित शर्माचा 'पारा' चढला; व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma: लाईव्ह सामन्यात भुवनेश्वर आणि अर्शदीपवर रोहित शर्माचा 'पारा' चढला; व्हिडीओ व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा थरार रंगला असून भारतीय संघाला स्पर्धेतील आपला दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. आशिया चषकाची स्पर्धा मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी झालेल्या भारत आणि श्रीलंका या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. कारण भारताला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी इतर संघावर अवलंबून राहावे लागणार आहे.

दरम्यान, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरूवात अतिशय निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा वगळता कोणत्याच भारतीय फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. रोहित शर्माने 41 चेंडूंत सर्वाधिक 72 धावांची खेळी करून यजमान संघासमोर 173 धावा उभ्या केल्या. दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या सलामीवीरांनी शानदार फलंदाजी करत 97 धावांची भागीदारी नोंदवली. भारतीय गोलंदाजांना आलेल्या अपयशामुळे कर्णधार रोहितची चिडचिड होत होती, याचाच प्रत्यय लाईव्ह सामन्यात पाहायला मिळाला.

रोहित शर्माचा 'पारा' चढला
रोहितने भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांच्याकडे दुर्लक्ष करून चाहत्यांना निराश केले. मात्र सामना झाल्यानंतर रोहितने संघाच्या खेळीचे कौतुक देखील केले. सध्या रोहित संतापला असल्याच्या व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भुवनेश्वर आणि अर्शदीप यांना हिटमॅनच्या संतापाचा सामना करावा लागला. तसेच नेटकरी रोहितच्या या कृत्यावर सडकून टीका करत आहेत. 

श्रीलंकेच्या विजयाची हॅट्रिक 
श्रीलंकेचा खेळ दिवसेंदिवस बहरत चालला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेने दमदार पुनरागमन केले. सुपर-4 च्या कालच्या सामन्यात त्यांनी जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतालाच बाहेर केले. भारताने विजयासाठी ठेवलेले 174 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने 6 गडी व 1 चेंडू राखून रोमहर्षक रित्या पार केले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कुसल मेंडिस ( 57) व पथूम निसंका (52) यांनी श्रीलंकेला दमदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या बळीसाठी 97 धावांची भागीदारी नोंदवली. त्यानंतर दासून शनाका व भानुका राजपक्षा यांनी 34 चेंडूंत नाबाद 64 धावा करून 6 गडी राखून विजय मिळवला. शनाका 18 चेंडूंत 33 धावांवर, तर राजपक्षा 25 धावांवर नाबाद राहिला.

 

Web Title: Rohit Sharma angry with Bhuvneshwar Kumar and Arshdeep Singh in live match, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.