वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे स्वभाव, नेतृत्व करण्याची शैली भिन्न आहे. विराट हा आक्रमक असला तरी रोहित मात्र शांत असतो. पण न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यानंतर रोहित चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर सर्वांसमोर रोहितने फिरकीपटू युजवेंद्र चहलचा अपमान केल्याची बाब समोर आली आहे. हा सारा प्रकार 'Chahal TV'वर घडला असून हा व्हिडीओ ट्विटरवरही उपलब्ध आहे.
भारतीय संघात सुरू झालेल्या नव्या परंपरेनुसार विजयाचा शिल्पकार असलेल्या खेळाडूला 'Chahal TV' वर बोलावले जाते. फिरकीपटू युजवेंद्र चहलची ही नवी भूमिका सर्वांच्या पसंतीत उतरत आहे आणि 'Chahal TV'वर येण्यासाठी प्रत्येक खेळाडू आतूरही असतो, परंतु कॅप्ट कूल महेंद्रसिंग धोनीनं 'Chahal TV'वर येण्यास रविवारी नकार दिला. धोनी 'Chahal TV'वर येत नाही, हे समजल्यावर भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माची मुलाखत चहलने घेतली.
धोनी चहलपासून लांब पळाला, पाहा हा व्हिडीओ
भारतीय संघातील दोन प्रमुख चेहरे कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 'Chahal TV'वर मुलाखत दिल्यानंतर हा कार्यक्रम भलताच हिट झाला. गत महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या वन डे मालिकेत 'Chahal TV'ची सुरुवात करण्यात आली. या टिव्हीवर क्रिकेटपटू सामन्यानंतर गप्पा मारतात आणि संघाच्या एकूण कामगिरीवर चाहत्यांना माहिती देतात.
सध्याच्या घडीला विराट हा संघात नाही. त्याच्या तिसऱ्या क्रमांकाच्या जागेवर मला फलंदाजी करण्याची संधी मिळेल का, असा प्रश्न चहलने रोहितला विचारला होता. त्यावर रोहित म्हणाला की, " मी या विषयावर संघ व्यवस्थापनाशी चर्चा करेन. त्यांच्यापुढे मी याबद्दल विचारणा करेन आणि त्यांनी परवानीगी दिली तर नक्कीच तुला संधी देण्यात येईल."
रोहित हे बोलताना शांत होता. पण त्यानंतर रोहितचा मूड बदललेला पाहायला मिळाले. रोहित त्यानंतर म्हणाला की, " भारतीय संघ फलंदाजीमध्ये फक्त 10 खेळाडूंचा विचार करतो. अकराव्या खेळाडूचा आम्ही फलंदाजीसाठी विचार करत नाही. जसा तू संघातील अकरावा खेळाडू आहे. "
रोहितचे हे वक्तव्य ऐकल्यावर चहलला धक्का बसला. चहल म्हणाला की, " रोहित, सर्वांसमोर माझा का अपमान करतो आहेस."
पाहा हा व्हिडीओ