मुंबई : यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) सत्रात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) नमवून विजयी सुरुवात केलेल्या चेन्नई सुपरकिंग्जची (Chennai Superkings) गाडी यानंतर घसरली. दुसरीकडे, मुंबईने विजयी धडाका लावत गुणतालिकेत अव्वल तीन संघांमध्ये स्थान मिळवले. चेन्नईच्या प्ले ऑफच्या आशा अत्यंत अंधूक झाल्या असून या अंधूक आशा कायम ठेवण्यासाठी त्यांना आपल्या उर्वरीत चार सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. त्याचवेळी मुंबईला केवळ दोन विजयांची आवश्यकता आहे. आज रंगणाऱ्या या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीची उत्सुकता क्रिकेटप्रेमींनाही आहे. त्यातच आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohita Sharma) याने ‘बॅलेन्स दी बॅट चॅलेंज’ देत सर्वांचे लक्षही वेधले आहे.
रोहितने दिलेल्या चॅलेंजला चाहत्यांकडूनही प्रतिसाद मिळत असून या चॅलेंजसाठी रोहितने दोघांना आव्हानही दिले आहे. शारजाच्या लहान मैदानावर आज मुंबई आणि चेन्नई एकमेकांविरुद्ध भिडतील. यावेळी पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी मुंबईकडे आहे. मात्र त्याचवेळी चर्चा रंगली आहे ती रोहितने सुरू केलेल्या चॅलेंजची.
रोहितने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या हाताच्या दोन बोटांवर क्रिकेट बॅटचा बॅलेन्स सांभाळताना दिसत आहे. या चॅलेंजला रोहितने ‘बॅलेन्स दी बॅट’ असे नाव दिले आहे. इतकंच नाही, तर या चॅलेंजसाठी रोहितने माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर आणि क्रिकेटतज्ज्ञ विक्रम साठ्ये यांना आव्हानही दिले आहे.
ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करुन नायर आणि साठ्ये यांना आव्हान देत रोहितने लिहिले आहे की, ‘मी वेळ आणि मैदानात योग्य संतुलन बनवण्यात व्यस्त आहे. तुमच्यासाठी येथे मी काहीतरी आणले आहे. हे बघा, बॅलेन्स दी बॅट चॅलेंज.... तुम्ही मला मैदानावर मात देऊ शकत नाही, तर काय झालं? येथे तुम्ही प्रयत्न करा.’
Web Title: Rohit Sharma Balance The Bat Challenge Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.